संत गजानन महाराज सेवा संस्थानच्या वतीने अमळनेर ते शेगांव वारीचे आयोजन.
भाविकांनी संपर्क साधण्याचे आवाहन.
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील मुंदडानगर गेट समोरील प्रतिशेगांव म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेले संत गजानन महाराज सेवा संस्थानच्यावतीने दिनांक १२/११/२०१८ ते१७/११/२०१८ या कालावधीत अमळनेर ते शेगांव पायी वारीचे आयोजन केले आहे असे संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सोमवार दिनांक १२/११/२०१८ रोजी सकाळी ५ वाजता संत गजानन महाराज मंदिर मुंदडानगर अमळनेर येथून पायी वारीची सुरवात होईल. त्या अगोदर सकाळी मंदीरात ५ वाजता महाआरती होईल. असे आयोजकांनी कळविले आहे.दिनांक १२/११/२०१८ रात्रीचा मुक्काम पिंप्री ता.धरणगाव.१३/११/२०१८ नशिराबाद.१४/११/२०१८ साळसिंगी जिल्हा परीषद शाळा.१५/११/२०१८ मलकापूर १६/११/२०१८नांदुरा भारतीय ज्ञानपीठ विदयालय.१७/११/२०१८ विसावा डाँरमेट्री हाँल शेगांव
संत गजानन सेवा संस्थानचे हे सहावे अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आहे.संस्थानच्यावतीने दरवर्षी अनेक भाविकांनसाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. वारीमध्ये धार्मिक पुस्तक, बातमी बिल्ला,टि शर्ट,टोपी,रूमाल, सर्व प्रकारच्या औषधी व कार्यक्रम पत्रीका देण्यात येईल विशेष सहकार्य हिरा उदयोग समुहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आहे असे गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष आर.बी.पवार यांनी कळविले आहे.
फोटो
अमळनेर मुंदडानगर भागातील प्रतिशेगांव येथील संत गजानन महाराजाचे मंदिर
छाया ईश्वर महाजन अमळनेर