Halloween party ideas 2015

दुष्काळी परिस्थिती व शेतकरी हित जोपासुन पाडळसरे धरणातून होणारा विसर्ग थाबविण्यासाठीच केले प्रयत्न- माजी आमदार साहेबराव पाटील

पाडळसरे धरणस्थळी केली येवून केली पाहणी,शेतकऱ्यांनी केले आधार व्यक्त

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

गेल्या वीस वर्षांपासून तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या अपूर्ण अवस्थेतील पाडळसरे धरणाचा गेल्या 2013/2014 साली झालेल्या कामा मुळे साठविण्यात येणारे 2 टी एम सी पाणी साठा गेल्या जुन महिन्यात दोन्ही पाईपाचे प्लेट काढल्याने ऑक्टोबर अखेर पर्यंत प्रवाहित होत असल्याने धरणातील जलसाठा 139 तलंका वरून 136 मीटर वर येऊन ठेपला होता, संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटिल यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाडळसरे धरणाचा होणारा वीसर्ग बंद करून धरणाचं काम करण्याचे नियोजन करावे अशी मागणी केली होती तसेच पाडळसरे येथील शेतकरी वर्गाने हि बागायती पिकांना पाणि कमी पडेल म्हणून प्लेट लाऊन पाणी प्रवाह बंद करण्यात यावा अशी मागणी केली होती त्या नुसार पाणी प्रवाह बंद झाला की नाही हे पाहण्यासाठी साहेबराव पाटील व शेतकऱ्यांनी धरण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या प्रसंगी धरणातील गेट नंबर 12 व 18 च्या पाईपाना प्लेट लावून वाळूच्या गोण्या टाकून कमी होणाऱ्या जल फुगवट्यात वाढ होत असल्याचे गेट वर प्रत्यक्ष शेतकरी वर्गासह नौकेवर जाऊन पाहणी केली त्यात पाडळसरे, कळमसरे, शहापूर, वासरे ,मारवड आदि भागातील शेत जमिनीवर लागवड केलेल्या ऊस,केळी, पपई आदी पिकांना उन्हाळ्यात टंचाई जाणवणार नसल्याचे सध्या तरी चित्र दिसून आल्याने उपस्थित शेतकरी वर्गा कडून माजी आमदार साहेबराव पाटिल यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटिल, विकास पाटिल,विश्वास कोळी, भूषण पाटिल,भिला साळुंखे,यशवंत कोळी, हेमंत पाटील,संजय पाटील,संदीप पाटील,माजी उपसरपंच रवींद्र पाटील,कळमसरेचे  पिंटू राजपुत, बाबुलाल पाटील,देखरेख संघाचे माजी चेअरमन विक्रांत पाटील,नगरसेवक निशांत अग्रवाल,कळमसरे,पाडळसरे,शहापूरआदी भागातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

फोटो

-पाडळसरे ता.अमळनेर- धरण स्थळी गेट न 12 वर पाणी विसर्ग बंद झाल्याची पाहणी करताना
माजीआमदार कृषीभूषण, साहेबराव पाटील,भागवत पाटील,आदी शेतकरी

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.