Halloween party ideas 2015

सानेगुरुजी नुतन माध्यमिक विदयालयातील दहावीच्या विदयार्थीचीं अशीही माणुसकी.

चोपडा येथील बालगृहातील अनाथ मुलांना केले शैक्षणिक साहित्य वाटप.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपण एक देणे लागतो या भावनेने सामाजिक बांधीलकी व नवनवीन शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता वाढ यासाठी सानेगुरुजी शाळा नेहमीच अग्रेसर असते.त्यात संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबराव पाटील, सचीव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक एस डी.देशमुख,यांच्या मार्गदर्शनाखाली

उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर व शिक्षक नेहमीच तत्पर असतात. असाच ऐन दिपावलीच्या सणात चोपडा येथील अमरसंस्था संचलित बालगृहातील अनाथ मुलां व मुलींना शैक्षणिक साहित्य दहावीचे विद्यार्थी व उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर यांनी आगळावेगळा कार्यक्रम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

              साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेले (चोपडा) येथील अमर संस्था संचलित बालगृहातील अनाथ मुला मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी व्यवस्थापक श्री शेषराव पाटील, साने गुरुजी विद्यालयाचे श्री डी ए धनगर सर हजर होते

फोटो

चोपडा येथे अनाथ मुलांनबरोबर सानेगुरुजी शाळेचे शिक्षक डि.ए.धनगर व विदयार्थी

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.