Halloween party ideas 2015

ऐन दिपावलीत नगरपालीकेने १४ लाभार्थ्यांना दिलीं घरकुल मंजुरीपत्रे

३६०घरकुलांचा प्रस्ताव शासनाने केला मंजूर.

आजपर्यंत २४६ लाभार्थ्यांनच्या घरकुलांना परवानगी.व बाकीच्या ११६ लाभार्थ्यांनां परवानगीची कारवाई सुरू.

अमळनेर नगरपालीकेला प्रथम अनुदानाचा टप्पा अनुदान म्हणून १ कोटी ४४ लाख रूपये प्राप्त.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर नगरपालीकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घटक क्रमांक १ ते४ असून १ व२ महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू आहे.घटक क्रमांक ३ व ४ ची अंमलबजावणी अमळनेर नगरपरिषदेत सुरू आहे.

     नगरपरिषदेच्या या कामास गती प्राप्त व्हावी व योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी याचा शासनस्तरावर तसेच व नगलपालीकास्तरावर सतत पाठपुरावा माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी अत्यंत कुशलतेने केल्यामुळे त्यास मुख्याधिकारी मानोरकर,उत्कर्ष गुटे,बी.टी.बाविस्कर, श्रीमती शोभा बाविस्कर यांचे योगदान लाभल्याने नाशिक विभागात अमळनेर नगरपारिषेदेने प्रथम क्रमांकाने लाभार्थ्यांनां अनुदानाचा पहिला टप्पा ऐन दिपावलीत दिल्याने नागरुकांचा आनंद द्विगुणित झाला.आहे.

      नगरपरिषदेने ३६० घरकुलांचे प्रस्ताव तयार करून शासनाने त्या ३६० घरकुलांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्याला अनुसरून नगरपरिषदेस शासनाने घरकुलांचे अनुदान रक्कम रूपये दोन लाख पन्नास हजार पर्यंत मंजूर केले असून त्याचा पहिला टप्पा  चाळीस हजार रूपायाचा आज चौदा लाभार्थ्यांनां आज नगरपालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, यांच्या हस्ते वितरण करण्यात आला.यावेळी विनोद लांबोळे, बांधकाम सभापती मनोज पाटील, सौ अँड चेतना पाटील, प्रविण पाठक,घनश्याम पाटील, रत्ना महाजन,नरेंद्र संदानशिव, सुरेश पाटील, संतोष लोहेरे,चेतन सोनार,प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अभियंता संजय पाटील,चंद्रशेखर वैद्य, नागेश खोडपे,सोमचंद संदानशिव, अविनाश संदानशिव, धिरज पाटील, मिंलीद चौधरी, हरीष पाटील, उपस्थित होते.सदर कार्यक्रम प्रसंगी मनोज पाटील, चेतन सोनार, यांनी घरकुल लाभार्थ्यांनां मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील म्हणाल्या कि ऐन दिपावलीत लाभार्थ्यांनां घरकुलांचा पहिला हप्ता दिल्यामुळे खुपच आनंद होत आहे.नगरपालीकेच्या माध्यमातून गोरगरिबांना आपल्या हक्काचे घर मिळत आहे याचे समाधान होत असून प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार घरकुल बांधावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संजय चौधरी यांनी केले.

फोटो

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा पहिला हप्ता मंजुरी पत्र देतांना लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नगरसेवक प्रविण पाठक,बांधकाम सभापती मनोज पाटील, रामभाऊ संदानशिव, नगरसेविका अँड चेतना पाटील,प्रशासन अधिकारी संजय चौधरी व नगरसेवक.

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.