आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करा-तहसीलदार प्रदीप पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करून घेण्यासाठी 2/1/2019 या अहर्ता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्ती यांना नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2018 ,,
दि 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या दरम्यान घोषित केलेला आहे त्यामध्ये मतदार म्हणून आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्या गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचेकडे नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 तात्काळ भरून द्यावा व लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा आता केवळ 14 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे तरी सर्व युवा / नवमतदार यांना पुन्हा एकदा नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे
प्रदीप पाटील
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमळनेर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.