Halloween party ideas 2015

पद्मावती मुंदडा विद्यालयात करुणा विचार कार्यक्रम संपन्न******

*विद्यर्थांनी जीवनात करुणा विचारअंगीकार करा.....*श्रद्धेय कस्तुरचंदजी बाफना***********....

अमळनेर प्रतिनिधी....

स्व सौ पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयात करुणा क्लब अंतर्गत 'करुणा विचार ' कार्यक्रम संपन्न झाला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यस्थान मुंदडा फौंडेशन चे सचिव श्री नरेंद्र भाऊ मुंदडा यांनी स्विकारले, तर मानवीय आहार शाकाहार चे प्रणेते श्रेध्येय श्री कस्तुरचंदजी बाफना, करुणा क्लब चे जिल्हा सचिव श्री दिनेश पालवे, श्री डी .ए. सोनवणे सर  यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती , वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने भारतरत्न डॉ कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात करुणा प्रार्थनेने करण्यात आली मान्यावरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेत आयोजित करुणा उपक्रमांचे माहिती सौ किर्ती सोनार यांनी विशद केली

यानंतर करुणा क्लब अंतर्गत शालेय स्तरावरील संपन्न झालेल्या करुणा कथा 2017  प्रतियोगिता पुरस्कार रोख रक्कम व प्रमाणपत्र चे वितरण आदरणीय बाफना जी व मान्यवरांचे हस्ते कु हर्षदा महाजन, कु सुषमा कोळी, कु काजल पवार, कु गौरी पाटील,कु रोहिणी पाटील, शुभांगी कोळी या यशस्वी विद्यर्थांना  गौरविण्यात आले 

कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी जीवनात शाकाहार, सदाचार, व्यासनमुक्तीव पर्यावरण रक्षणाचे महत्व या विषयावर आदरणीय बफनाजींनी मौलिक मार्गदर्शन केले,विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचे आचरण करून जीवनात करुणा विचार अंगिकारण्याचे व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन श्री बाफनाजींनी विद्यार्थ्यांना केले यावेळी शाळेतील करुणा क्लब च्या विचाराने प्रेरित होऊन आजन्म शाकाहाराची शपथ- प्रतिज्ञा घेणाऱ्या कु दिव्या फुलसिंग भिल, इ 5 वी व चि रोहित विसपुते इ 8 वि या विद्यर्थांना विशेष भेट व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले, जिल्हा करुणा सचिव श्री दिनेश पालवे यांनी शाळेत करुणा क्लब अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधन व्यक्त करून विद्यार्थ्यांना जळगाव येथिल अहिंसा तिर्थ गोशाळेस भेट देण्याचे आवाहन केले,

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करुणा शिक्षक श्री प्रदीप चौधरी व आभार करुणा संघटक श्री गोकुळ बोरसे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ स्वाती पाटील, सौ वंदना पाटील, सौ रुपाली महाजन, श्री प्रकाश पाटील श्री सागर महाजन, श्री राहुल पाटील, श्री दीपक बागुल यांचे सहकार्य लाभले

वंदे मातरम गीताने सांगता झाली

फोटो

अमळनेर येथील स्व सौ पी.एन मुंदडा विदयालयातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवर

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.