*शिक्षकाची नोकरी सांभाळून ग्रामीण भागातील तरुणांसाठी उभारली मोफत स्पर्धा परीक्षा चळवळ*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सर आज आपल्या वाढदिवसानिमित्त चार ओळी.
*आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो
पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत
काही नाती क्षणांची असतात
काही नाती व्यवहाराची असतात
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो
जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजवितात,
असचं नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला
म्हणजे मा.पवार सरांना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
💐🎂🎂🎂💐🎂🎂
अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील बी वाय चौधरी हायस्कुल मधील उपशिक्षिक श्री विजयसिंग पवार यांनी शिरसाळे येथे शिक्षकाची नोकरी सांभाळून ग्रामीण भागातील तरुणांसाठी 2011 साली तालुक्यातील काही शिक्षकांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या प्रेरणेने शिरसाळे येथे *एकाग्रता करिअर डेव्हेलोपमेंट पॉईंट या नावाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले त्यात गावातील तरुणांना दर रविवारी स्वखर्चाने पोलीस,आर्मी ,नेव्ही भरती तसेच पीएसआय एसटीआय एमपीएससी बँक पोस्ट रेल्वे भरती सोबत विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन सुरू केले सोबत पोलीस आर्मी भरती करिता शारीरिक चाचणीची सुद्धा सोय करण्यात आली ग्रामस्थांनी मोलाची साथ देऊन अभ्यासिकेची व पुस्तकांची व्यवस्था करून दिली या अभ्यासिकेत गावातील तरुण अभ्यास करतात चोवीस तास अभ्यासिका सुरू असते.या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या चळवळीतून तरुणांमध्ये स्पर्धा परिक्षांविषयी गोडी निर्माण झाली त्यामुळेच गेल्या सात वर्षात गावातील अठ्ठावन्न तरुणांना विविध शासकीय सेवांमध्ये नोकरी मिळाली .यात तरुणांनी केलेली मेहनत ग्रामस्थांनी दिलेली साथ अनेक मार्गदर्शकानी केलेले मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले .शिरसाळे हे गाव तालुक्यातील एक आदर्श गावं आहे कमालीची सामाजिक धार्मिक एकता गावात आहे त्यामुळेच हा उपक्रम प्रभावीपणे राबवू शकलो.प्रशासनातील अनेक मान्यवर अधिकारी यांनी मोलाचं मार्गदर्शन केले सोबत तालुक्यातील शिक्षक मित्रांची चांगली साथ मिळाली तसेच पूज्य सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व संचालक मंडळ आणि शिक्षक बांधवांच सहकार्य लाभलं.
एका छोट्याशा उपक्रमामुळे एवढा बदल होत असेल तर ही चळवळ व्यापक करण्याचा विचार मनात आला त्यानुसार संपूर्ण अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने तालुक्याच्या ठिकाणी अमळनेर येथे *पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या* सहकार्याने दोनहजार सोळा साली (2016) *पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र* सुरू केले या केंद्राचा फायदा तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना होत आहे सोबत पारोळा व चोपडा येथील तरुण या केंद्रात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत या केंद्रात गेल्यावर्षी चंदन पाटील यांची जळगांव पोलीस पदी निवड झाली तसेंच स्वप्निल वानखेडे हे एसटीआय परीक्षेत ओबीसी संवर्गातून राज्यात प्रथम आले व आरटीओ पदी सुद्धा त्यांची निवड झाली आहे अनेक विद्यार्थी या मोफत मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेवून भविष्यात उच्च पदांवर जातील.उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते.यात वित्त व लेखाधिकारी कपिल पवार जळगांव नोबेल फाउंडेशन जळगांवचे अध्यक्ष जयदीप पाटील एसटीआय आरटीओ स्वप्निल वानखेडे पीएसआय गोपीचंद नेरकर चांदणी पाटील भुषण सोनार शरद सैंदाणे मोहन पाटील भुषण पाटील टॅक्स असिस्टंट हर्षा साळुंखे डीएसओ विनोद धनगर पोलीस चंदन पाटील इत्यादी नवोदित अधिकारी तसेच पत्रकार उमेश काटे शिक्षक व्ही एन ब्राह्मणकर डी के पाटील शरद पाटील अनिल पाटील जयेश काटे सोपान भवरे सतिष कांगणे प्रा पी के पाटील शिवाजी पाटील टी के पावरा हे मोफत मार्गदर्शन करतात. नागपूरच्या डिसीपी अनिता पाटील अमळनेरचे प्रांताधिकारी संजय गायकवाड डीवायएसपी रफीक शेख तहसीलदार प्रदिप पाटील पीआय अनिल बडगुजर प्रताप कोलेजचे उपप्राचार्य एस ओ माळी युनियन बँकेचे मॅनेजर मयूर पाटील उदय पाटील इत्यादी मान्यवर वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देतात.पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेरचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सर्व संचालक मंडळ व सन्माननीय सभासदांचं व कर्मचारी वर्गाचं बहुमोल सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे भविष्यात अनेक अधिकारी या चळवळीच्या माध्यमातून तयार होतील असा आमचा मानस आहे त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत राहू.समाजातील सर्व थरातून मदतीचे हात या आदर्श उपक्रमाच्या वाटचालीसाठी पुढे येत आहेत.
एमपीएससी यूपीएससी व सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी आमच्या पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतच केली जाईल तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा .सोबत खेडोपाडी गाव तेथे अभ्यासिका सुरू करून तरुणांना गावातच अभ्यासाची सोय करून दिली जाईल यात ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा असेल.
पुनश्च सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐💐🎂🎂🎂🎂
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर.