*शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होणार*
शिक्षक भारती संघटना करणार पाठपुरावा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि.२०/१०/२०१८ वार्ताहार,
शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक भारती शासनमान्यता प्राप्त संघटनेची जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांच्या अध्यक्षतेत तक्रार निवारण सभा घेण्यात आली. प्रथम शिक्षक भारतीच्या प्रथेप्रमाणे शिक्षणाधिकारी श्री.देविदास महाजन यांचे शाॅल पुष्पगुच्छ आणि शिक्षक भारतीचे सृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सभेत आलेल्या तक्रारी लवकरच निवारण केले जाईल असे अस्वासन कर्मचारी यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले.
२००५ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी *शिक्षक भारती संघटना*
आ.कपिल पाटील यांच्या मार्फत पाठपुरावा करणार आहे.
मिटींगमध्ये वैयक्तिक मान्याता, अनुकंपा मान्याता,बदली मान्याता,मेडिकल बीले विनाविलंब आणि प्रत्येक महिन्याला पाठवणे, भविष्य निर्वाह निधी चे प्रकरणे १ते१५ आणि १६ ते ३१ अश्या दोन टप्यात पाठवले जाणार आहेत. बदली प्रस्ताव, नावात बदल अश्या प्रस्तावांबाबत ७ दिवसाच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित कर्मचारी यांना देण्यात आलेत. संचमान्याता दुरुस्ती, पी एफ , डि.सी.पी.एस हिशोब वेळेवर देणे. शिक्षक भारती संघटना आॅनलाईन पी.एफ . हिशोब साठी प्रयत्न करणार.
सेवाजेष्ठता नविन जी.आर. सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी लवकरच कॅम्प लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले.
जनगणनाचे काम केलेल्या शिक्षकांचे EL सर्विस बुक मध्ये नोंद करणे अशा प्रश्नांचा निपटारा करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले. विषय वाचन संजय वानखेडे यांनी केले आभार भावेश अहिरराव यांनी मानलेत मिटींगला सोमनाथ पाटील,आर जे पाटील,परिमल पाटील,विजय सोनवणे,दिपक आर्डे,डी आर पाटील, अमोल वाणि शांताराम महाजण, चंद्रकांत देशमुख,राहुल देशले, संजय पाटील,महेद्र पाटील, चंद्रकांत पाटील,राहुल पाटील, हेमंत सावकारे,विनोद पाटील उपस्थित हिते.