*अनंत निकम यांच्या तक्रारी मूळे तळवाडे ग्रामपंचायत तात्कालीन सरपंच-भटू भावराव पाटील व उपसरपंच राजेंद्र रघुनाथ पाटील यांना विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्या न्यायालयाने पदावरून अपात्र केले.*
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सदरील हे प्रकरण साल २०१६ चे असून तळवाडे तत्कालीन सरपंच भटू भावराव पाटील व राजेंद्र रघुनाथ पाटील गावातील नॉनऍग्री गावठाण जमीन गट नं-१० ही कुठलाही ग्रामपंचायत ठराव नकरता तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना नकळवता परस्पर शिरपूर पॉवर प्लांट यांच्या २२०kv च्या अजस्र मनोऱ्या साठी रु.१००च्या शासकीय बॉण्डवर रु१,६०,०००/- घेतले असा उल्लेख करून सदरील कंपनीकळून घेतलेला चेक ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात परस्पर जमाकेेले आणि गावठाण जागा वाणिज्य व्यापारासाठी कंपनीला देऊकेली तसेच गावातील धंदाई मातेच्या मंदिरासाठी रु.२,५०,०००/- देखील घेतले.सदरील बाब ही बेकायदा आहे असे श्री.अनंत निकम ,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष ,अमळनेर यांना लक्ष्यात आली आणि त्यांनी सांबधित बेकायदा बाबींचे दस्तावेज तळवाडे ग्रामपंचायती कळून माहितीच्या अधिकारावर मिळवले व मा.गटविकास अधिकारी,अमळनेर व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ,जळगाव यांच्या कळे तक्रार केली व ग्रामपंचायत पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर श्री.अनंत निकम यांनी स्वतः पुराव्यानिशी युक्तिवाद केला होता. *युक्तिवादात महत्वाचा मुद्दा सदरील गट.क्र-१० ह्यावर साल २०१० च्या ग्रामसभेत sc,st,nt,इ बांधवान साठी इंदिरा आवास योजनचे घरकुलांन साठी जागा राखीव ठेवली असून मा.जिल्हाधिकारी ,जळगाव यांच्याकळे तात्विक मंजुरीला पाठवले असतांना जमीन देणे म्हणजे दलित बांधवांचा हक्कावर गदा आणण्याचा कुटील डाव सांबंधित पदाधिकाऱ्यांनी केला अश्या तीव्र शब्दा मांडण्यात आले होते .*
तदनंतर तक्रार माघे घ्यावी यासाठी तत्कालीन उपसरपंच राजेंद्र रघुनाथ पाटील यांनी अनंत निकम यांच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदकरून २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती तरीही निकम यांनी पाठपुरावा बंद केला नव्हता.
अखेर २६ जुलै २०१८ रोजी मा.विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ,१९५८ चे कलाम,३९(१) नुसार पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी सध्याच्या कार्यकाळासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे हा निर्णय श्री.राजाराम माने बनकर ,विभागीय आयुक्त ,नाशिक यांनी दिला आहे.