Halloween party ideas 2015

*डिजीटल शाळा पिंगळवाडे येथे इ. 8 वी ऑनलाईन प्रशिक्षणास यशस्वी सुरुवात...*
अमळनेर प्रतिनिधी

         आज दि.24/9/2018 रोजी जि.प.उच्च प्राथ. शाळा, पिंगळवाडे ता.अमळनेर येथे इ.8 वी पुनर्रचित अभ्यासक्रम ऑनलाईन प्रशिक्षणास यशस्वी सुरुवात झाली. सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संगणक- प्रोजेक्टर द्वारे व्हर्च्युअल क्लासच्या प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी पिंगळवाडे शाळेचे उपशिक्षक तथा तंत्रस्नेही शिक्षक श्री.दत्तात्रय सोनवणे यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. सदर ऑनलाईन प्रशिक्षणात सकाळ सत्रात 10:30 ते 11:30 मराठी बालभारती व दुपार सत्रात 3:30 ते 4:30 हिंदी सुलभभारती या दोन विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वीपणे घेण्यात आले. याप्रसंगी अंतुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख आबासोा. श्री. गोकुळ आनंदा पाटील, सावखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख दादासोा. श्री.एस्. बी. पाठक, अमळगांव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री.भगवान पाटील सर व *अमळगांव, सावखेडा व अंतुर्ली* केंद्रातील प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते.
         डिजीटल इंडीया ची यशस्वी वाटचाल करत संपुर्ण राज्यातील शिक्षकांना एकाच वेळी व दुरस्थ शिक्षण पध्दतीने राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत व्हर्च्युअल क्लास च्या माध्यमातून JIO TV वरील वंदे गुजरात चॅनल-1 या शैक्षणिक वाहिनी द्वारे लाईव्ह प्रक्षेपण करुन सदर प्रशिक्षण राज्यभर घेण्यात येत आहे.
         इ. 8 वी ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वीतेसाठी पिंगळवाडे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वंदना ठेंग, तंत्रस्नेही शिक्षक श्री.दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक श्री.प्रविण पाटील व उपशिक्षक श्री.रविंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.