Halloween party ideas 2015

कृषीपंप धारक थकबाकीदार शेतकऱ्यांकडून महावितरणाने सक्तीची वसुली थांबवावी.
माजी आमदार साहेबराव पाटील यांची उर्जा मंत्रीकडे मागणी.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुका अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या अमळनेर विधानसभा मतदार संघात सप्टेंबर अखेर सरासरी पर्जन्यमानाच्या पन्नास टक्के कमी पर्जन्यमानामुळे भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.आणि इतर अनुषांगीक कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.दुष्काळात हाताची पिके गेल्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
   अशा परिस्थितीत महावितरण कंपनीच्या संदर्भाधीन पत्रामुळे शेतकऱ्यांनच्या कृषीपंपाना विदयुत पुरवठा करणारे रोहीत नादुरुस्त झाल्यास दुरस्तीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनकडून सक्तीने तिन ते पाच  हजार रुपये वसुल करावी त्याशिवाय रोहीत दुरस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार नाही असा सक्तीचा वसुली आदेश आहे.
वास्तविक सदय परिस्थितीत दुष्काळामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न नाही म्हणून तो थकबाकी भरण्याचा परिस्थीतीत नाही. आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तो कुत्रीम पाणी घेऊन शेती करण्याच्या तयारीत आहे अशात बेकायदेशीर विज कनेक्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांनमुळे जादा भार पडून व कृषीपंप नादुरुस्त होत आहे. त्यामुळे विज चोरी प्रामाणिक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आणि वितरण सक्तीची वसुलीचा आदेश देत आहे त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला वेळेवर कुत्रीम पाणी देता आले नाही तर मिळणारे थोडेफार उत्पन्नही त्याला मिळणार नाही. त्यामुळे नादुरुस्त रोहीत्रांसाठी सक्तीची वसुली अमळनेर विधान सभा मतदार संघातील थकबाकीदार शेतकऱ्यांनकडुन न करता विज चोरांना जास्तीचा दंड लावून वसुल करण्यात यावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी पत्राद्वारे मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.