वार्तापत्र
कपाशीवर रोगांचे थैमान, वरूणराजाही रूसला.
अमळनेर तालुक्यातील शेतकरीवर आसमानी संकट
खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता.
अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन)-सध्या अमळनेर तालुक्यात शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.त्यात कपाशीवर अनेक प्रकारचे रोगांचे थैमान झाल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.
अमळनेर तालुक्यातील देवगांव देवळी, दहिवद, पातोंडा,अमळगांव, पिंपळी,मारवड, कळमसरे, निम,शहापूर, मुडी मांडळ परीसरात यावर्षी कमी पाऊस झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे.शेतीत कपाशी पिकाला एकरी बारा हजारपेक्षा अधिक खर्च लागल्याचे बोलले जात आहे.परंतु उत्पादन खर्चापेक्षा कमी येईल असे शेतकरी बांधवामध्ये बोलले जात आहे.त्यामुळे यावर्षी दिपावली अंधारात जाण्याची शक्यता आहे.
सध्या तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने पशुधनाचा चाराचा प्रश्न गहन बनणार आहे.महागडी जनावरे शेतकरी बांधवाकडे असल्याने त्यांना चारा कुठून आणावा? हा प्रश्न आहे सप्टेंबर महीन्यापासूनच चारा पाणी याचा प्रश्न असेल तर महागडी जनावरे कवडीमोल भावात विकावी लागतील.असे शेतकरी बांधवामध्ये चर्चा सुरू आहे.यावर्षी नद्या नाले यांना महापुर आला नाही. त्यामुळे विहीरांना पाणी नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.मागच्या वर्षी दुष्काळाचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागला होता.
महागडी बियाणे, खते, मजुरी ,फवारणी औषधी यामुळे शेतकरी बांधवाचे कंबरडे मोडले आहे.यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.शासनाने शेतकऱ्यांना
हमी भाव दिला जाईल घोषणा केली पण ती हवेत विरली असे बोलले जात आहे.
सध्या महागाई वाढल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. पेट्रोल दसरा पर्यंत शंभरी गाठणार का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.एकीकडे कपाशी, मुग,मका,ज्वारी, बाजरी या पिकाचे पावसामुळे उत्पन्न कमी असल्याने खर्च निघेल का? हा प्रश्न असतांना शेतकऱ्यांना मालाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.शेतकरी बांधवांना सरकारने मदतीचा हात दयावा असे बोलले जात आहे. आतापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पुढे कसे होईल शेतकरी वर्ग चिंतेत आहे.त्यात महावितरण अव्वाच्या सव्वा वीजबील आकारत असते.शेतकरी बांधवाचा कोणी सध्या वाली नाही. सध्या शासनाला अच्छे दिन आहेत.जनतेला नाही. अशी ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे.
फोटो
ईश्वर महाजन
अमळनेर तालुका प्रतिनिधी
9860352960