सानेगुरुजी पिक सोसायटीच्या चेअरमनपदी दशरथ लांडगे
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर सानेगुरुजी सहकारी पीक संरक्षक सोसायटी लिमेटेड अमळनेर या संस्थेच्या चेअरमनपदी दशरथ सोमा लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक संजय कौतीक पाटील, संजय भिला पाटील, संजय लांडगे, बाबुराव देसले,भगवान पाटील हे उपस्थित होते.त्यांचे अभिनंदन ओबीसी शिक्षक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विलासराव पाटील, जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,महीलाजिल्हाध्यक्षा वसुंधरा लांडगे, तालुकाध्यक्ष सोपान भवरे,शहराध्यक्ष डि.ए.सोनवणे,जिल्हाकार्यकारणी सदस्य प्रभाकर विंचुरकर, मनोहर पाटील, एन.आर.चौधरी, वसंत पाटील, भगवान चौधरी, अनिल पाटील, संजय लांबोळे,कळवंत पाटील, गुलाब महाजन यांनी केले.
अनेक संघटना व सहकारी मित्र परीवाने त्यांचा सत्कार केला व भावीवाटचालीस शुभेच्छा दिल्या.