अमळनेर येथे शिवाजी नाटयसभागृहात
युवा नाट्य संमेलनातील गाजलेला परिसंवाद
अनेक मान्यवराची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन )-अमळनेर येधील शिवाजी नाटयसभागृहात नाटयसंमेलनात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, आ.शिरीष चौधरी, आ.स्मिता वाघ,माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, दिग्दर्शक शिवाजी पाटील, प्रचार्य तानसेन जगताप, महाराष्ट्र साहित्य परीषद पुणे येथील कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार, प्रकाश पायगुडे, रमेश पवार ,स्वागत अध्यक्ष डिंगबर महाले,व नाटयसंमेलानचे अध्यक्ष हर्षल पाटील होते.
मराठी साहित्यकासाठी मराठी साहित्य संमेलन एक मेजवानी आहे. असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर म्हणाले. तर आमदार शिरीष चौधरी, आ.स्मिता वाघ,माजी आमदार यांनी अमळनेर नगरीत एवढे मोठे नाटयसंमेलन होत असल्याचा आनंद खुप मोठा असून साहित्यिक व तरुणासाठी एक मोठी गिफ्ट आहे असे सांगितले. तर नाटय संमेलनाचे अध्यक्ष हर्षल पाटील म्हणाले कि स्पर्धेच्या पलीकडे जाणारे नाटक निर्माण व्हायला हवे,नाटयासाठी जोपर्यंत स्वतंत्र विदयापिठ होत नाही तोपर्यंत कलेला बळ येणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तर स्वागत अध्यक्ष डिगंबर महाले म्हणाले कि जीवन हेच मुळात जितं जागत रंगमंच आहे.युविपिढीने अभियानाकडे गांभीर्याने पहावे असे सांगितले.
तरुणांचा रंगभूमीवरील उत्साही वावर आणि नाट्य चळवळीतील सहभाग पाहता खान्देशी रंगभूमी चे भवितव्य उज्ज्वल असल्याचा विश्वास विविध नाट्य कलाकार,साहित्यिक व प्राध्यापक वक्त्यांनी दुपारच्या सत्रात "खान्देश रंगभूमी सद्यस्थिती व भविष्य" या विषयावरील परिसंवादात मांडले तर युवा श्रोत्यांमधून, आपल्या साहित्यिकांनी अहिराणी व बोलीभाषेतून व्यक्त होताना लाज वाटायला नको असा संतापवजा सूरही व्यक्त करण्यात आला.
बोलीभाषेतून व्यक्त झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले गेले यातूनच खान्देशी साहित्तिक व रंगभूमीचे कलाकारांचे भवितव्य आशादायी राहील असे वक्त्यांनी सांगितले तर श्रोत्यांमधून उपस्थित निर्माता दिग्दर्शक शरद जाधव युवती , पत्रकार संजय पाटील, रणजित शिंदे ,अहिराणी नाटककार संतोष पाटिल, मनोज भांडारकर तसेच उपस्थित युवतींनीही खान्देशी रंगभूमी व बोलीभाषा स्थानिक साहित्य चळवळी साठी प्रश्न विचारत महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.
नंदुरबार येथिल नागसेन पेंढारकर यांनी नाट्य चळवळीचा वेध घेतांना नाटकाचा 'न' माहीत नसलेले नंदुरबार आता 'क' पर्यंत पोहचले असल्याचे सांगितले. काबाड कष्ट करणाऱ्या श्रमजीविंचे सोंगाड्या पार्टी ते नाटक असा प्रवास खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात झाला असल्याचे सांगितले.स्वातंत्र्य पर्वकाळात मेळ प्रकारातून नाटकाचा प्रयोग सुरू झाला तो अव्याहतपणे सुरू असतांना खान्देशातील नाट्य कलावंत व साहित्यिकानी खान्देश रंगभूमीला एकत्रितपणे बळ द्यावे असे आवाहन केले.
जळगांव येथिल प्रा. राजेंद्र देशमुख यांनी खान्देशी रंगभूमी सशक्त आणि समृध्द करणारी पिढी तयार झालेली आहे.नाटकास यावकांनी करिअर म्हणून स्वीकारावे असे सांगितले तर जळगांव च्या रंगभूमीवर प्रतिकूल परिस्थितीत प्रतिक ते परिवर्तन असा झालेला प्रवास कवी- केळी -कपाशी -कलावंत अश्या अंगाने झाला असल्याचे सांगितले.
नाशिक येथिल साहित्यिक किरण सोनार यांनी खान्देशातून प्रतिभावंत व नामवंत कलाकार राज्यासमोर यायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
ज्ञानेश्वर धोंडे जळगांव यांनी
"संवेदनांचा काटा मनाला टूचणे म्हणजेच जीवनातील नाट्य आहे संवेदनशीलता आहे आणि रंगभूमीवर उत्तम ते देत राहू
तो पर्यंत आपण निश्चितच उज्ज्वल भविष्यासाठी आशावादी आहोत.
विरेंद्र पाटिल भुसावळ यांनी खान्देशच्या रंगभूमीने पुणे,मुंबईच्या प्रभावातून बाजूला व्हावे व स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे तसेच विचार ज्या भाषेच मनात जन्माला येतो त्याच भाषेत व्यक्त होणे गरजेचे आहे असे मत मांडले.
नारायण बाविस्कर,जळगांव हौशी व प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकारांनी व्यावसायिक पातळीवर यशस्वी होण्याचा आदर्श नवयुवक नाट्य कलाकारांसमोर उभा करायला हवा.असे सांगितले.
मंचावर संमेलनाध्यक्ष हर्षल पाटिल,स्वागताध्यक्ष डिगंबर महाले,आदि उपस्थित होते.प्रास्ताविक भाऊसाहेब देशमुख,अमळनेर यांनी केले. परिसंवादाचे अध्यक्ष जेष्ठ रंगकर्मी
चिंतामण पाटिल ,जळगांव यांनी खान्देशची सद्याची रंगभूमी समृद्ध असल्याचे सांगितले.
संघर्षातून माझी निर्मिती साकारली गेली,सिनेमांच्या निर्मितीसाठी केलेले काम माझ्या जगण्याचा भाग आहे.जे शिकलो ते अनुभवातून व्यक्त करीत मोठा झालो.असा जीवन संघर्षाचा प्रवास मांडतांना मराठी फिल्म स्वतःसाठी करायची की लोकांसाठी याप्रश्नात उत्तर लोकांसाठी याबाबत स्पष्टता असणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे असे विचार मराठी सिनेनिर्माता दिग्दर्शक शिवाजीराव पाटिल यांनी व्यक्त केले.
प्रसिध्द अभिनेत्री विना जामकर यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडताना काही महत्वपूर्ण मुद्देही मांडलेत.मुलींना अभिनेत्री करणेसाठी पालक धास्तावलेले असतात ,चित्रपट क्षेत्रात आज नवोदितांच्या संघर्षाच्या काळात कास्टिंग काऊच्या निमित्ताने होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनेक चर्चा कुचर्चा पालकांच्या कानावर पडलेल्या असतात ,अश्यावेळी पालक,समाज,परिसर व चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी मिळून मुलींवर धीटपणाचे,धाडसाचे संस्कार करून तिला या ही क्षेत्रात पुढे पाठवायला हवे. या क्षेत्रात मुलींना करिअर करायला खूप संधी आहे.प्रामाणिक प्रयत्नांच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश नक्कीच मिळते असेही वीणा जामकर यांनी सांगितले
मुलाखत प्रा.विनय जोशी यांनी घेतली
फोटो
मराठी युवा नाटयसंमेलनातील काही क्षणचित्रे
छाया ईश्वर महाजन अमळनेर