स्पार्क फाऊंडेशनच्या वतीने इतिहासकालीन शस्त्रास्त्रे प्रर्दशन
अमळनेर मराठा मंगल कार्यालयात पाहण्यासाठी मोठी गर्दी
शस्त्रास्त्रे प्रर्दशनामुळे वाचकांच्या ज्ञानात भर
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात स्पार्क फाऊंडेशनच्या वतीने कांर्तीकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भव्य दुर्मिळ इतिहासकालीन शस्त्रास्त्रे प्रर्दशन व दर्शन सोहळा २८ सप्टेंबर ते३० सप्टेंबर २०१८ ठेवण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी,समाजसेवक शिक्षक,साहित्यिक, नागरिकांनी भेट दिली.
स्पार्क फाऊंडेशनच्या वतीने मराठा मंगल कार्यालयात इतिहास प्रेमींसाठी शस्त्रास्त्रे प्रर्दशन एक मेजवानी आहे.यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रे कशी होती याची माहीतीचे ज्ञान मिळाले असे जळगांव जिल्हयाचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
व्यासपीठावर आ.स्मिता वाघ,माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, लीना पाटील, विजय पाटील, डि.बी.जाधव,देवयानी जाधव,प्रशांत जगदाळे पकंज दुसाने, लता दुसाने, निशा दुसाने ,प्रतिभा पाटील, होते.
सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शस्त्रास्त्र सग्राहक व अभ्यासक पकंज दुसाने यांनी सांगितले की भविष्यात रायफल शुर्टीग अँकदमी सुरू करणे व पुरातन वस्तू संग्रालय सुरू करण्याचा मानस आहे. स्पार्क फाऊंडेशनच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.परीक्षक म्हणून चोपडा येथील ललीत कला विदयालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन व अमळनेरचे आर.डी.चौधरी यांनी काम पाहीले. सुत्रसंचालन व आभार प्रर्दशन अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ वसुंधरा लांडगे यांनी केले.
अमळनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी व महीला शस्त्रास्त्रे प्रर्दशन पाहण्यासाठी अफाट गर्दी केली आहे.
या शस्त्रास्त्र प्रर्दशनासाठी अनमोल मार्गदर्शन सौ वसुंधरा लांडगे यांनी तर अनमोल सहकार्य परेश भामरे,सौरभ जाधव,किरण शिरसाट, यश वर्मा,वैभव खैरनार, विकास पाटील यांनी केले.