Halloween party ideas 2015

युवा साहित्य संमेलनातून अहिराणी भाषेचा झाला सन्मान.

अनेक कवीनी सादर केल्या कवीता.
सारांश सोनार,

भूमिका घोरपडेची कवीताला प्रेक्षकांनी दिली दाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

खान्देशी लोकसाहित्य हे अस्सल अहिराणीतील साहित्य असून आपण आपली संस्कृती जतन करायला हवी तरच अहिराणी ला मानपान मिळेल.असा

युवा नाट्य साहित्य संमेलनातील अहिराणी साहित्यिककानीं

अहिराणी भाषेचा केलेला जागर उपस्थितांना हसता हसता चिंतन करायला लावणारा आणि अस्सल मायबोलीची मेजवानीच ठरला.ठसकेबाज आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अहिराणी भाषेतील परिसंवाद युवा नाट्य संमेलनातील साहित्यिक मेजवानीचा कळस ठरला.

           रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः उभे राहून खान्देशी अहिराणी साहित्यिकांना टाळ्या वाजवत उत्स्फूर्त सलामी दिली.

               अहिराणी साहित्यिक आणि तहसीलदार सुदाम महाजन यांनी "खांदावर मनी जत्रा चालनी...

 तू यी जाय कानी कानी" या कवितेतून

अहिराणी भाषेच्या लकबी मांडतांना सुमधुर लयबद्ध कवितांचे सादरीकरण केले.यावेळी त्यांनी भाषेतून व्यक्त केलेला अहिराणी बाज  उपस्थितांच्या जोरदार

 टाळ्या घेऊन गेला.

पर्यावरणावर आधारित कवीता भूमिका घोरपडे हिने सादर केलेल्या कवीतेला प्रेक्षकांना खुपच आवडली.कवी सारांश सोनार याची बाप कवीता छान होती.अनेक कवींनी छान कवीता सादर केल्या.

            'आयत पोयत संख्यान' हा प्रयोग प्रविण माळी  यांनी या परिसंवादात सादर करून रसिक श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या मिळविल्यात.सूरत पासून बऱ्हाणपूर अहिराणीचे साम्राज्य आहे  असे सांगताना "जठलोग मनी माय माऊली घटयावर दयन दयी र्हायनी तथलॉंग अहिरणी ले धोका नही शे!"असा विश्वास व्यक्त केला. अहिराणी भाषेचे दर कोसावर बदलत जाणारे वैशिष्ट्य आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले.

              "तोंडाय अक्का"कार  प्रा.योगिता पाटिल यांनी अहिराणी भाषेच्या आणि स्त्री संस्कृती चा मिलाफ रसिकांसमोर मांडताना श्रोत्यांना चिंतनशील केले.

            आपल्या खुमासदार शैलीतून दाभाडी चे  डॉ. एस.के.पाटिल  यांनी अहिराणीतुन ग्रामिण संस्कृतीचे आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले तर अहिराणीचे वैभव हे आपल्या रोजच्या बोलीतून वाढले पाहिजे अहिराणी संस्कृती जतन करण्यातूनच टिकून राहील.असे विवेचन केले.

युवकांमधील नैराश्य हे कलेने दूर होऊ शकते.युवकांमधील उर्मी व्यक्त करण्यासाठी कलेचे सादरीकरण हा उत्तम मार्ग आहे.युवा नाट्य साहित्य संमेलनाचे समारोप पूर्व परिसंवादात उमटलेला युवकांच्या भाव विश्वाचा कलात्मक अंगाने वेध घेतला गेला.

             भावविश्व कोलमडलेल्या युवा पिढीतील युवकांना व्यक्त होण्यासाठी , प्रकट होण्याकरिता संधी मिळाली पाहिजे...अन्यथा संधीच्या शोधात युवकांना विस्थापित होण्याची वेळ येते अशी खंत मोल चित्रपटातील अभिनेता योगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

             आजच्या पिढीत मोठ्याप्रमाणात होणारे स्थित्यंतर हे सुप्त स्वरूपात आहे

         खान्देशी मातीत केवळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नात्याचळवळ कधी काळी चालायची मात्र आता बदलत्या काळात संधीचे दालन सर्वत्र उघडलेले आहे !

       युवकांच्या भावविश्वातील नाट्य व साहित्य या विषयावर सम्पन्न झालेल्या परिसंवादात "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" चे लेखक व अभिनेता राजकुमार तांगडे यांनी युवकांनी आपल्या भावविश्वाचा वेध घेताना आसपासच्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी संवेदनशील मनाने टिपून त्या भूमिकेतून व्यक्त झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अभिनेत्री मंजुषा भिडे यांनी मोबाईल, इंटरनेटच्या युगात तरुण वाचन, चिंतन व त्यातून येणाऱ्या अभिव्यक्ती पासून दूर जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. अभिनेता व दिगदर्शक योगेश कुलकर्णी यांनी मोल चित्रपट रसिकांनी मनापासून स्वीकारल्याबद्दल आंनद व्यक्त करत महाविद्यालयात पातळीवर तरुणांना कला क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली। नॅशनल अवार्ड विजेत्या "भर दुपारी" या शॉर्ट फिल्मचे दिगदर्शक स्वप्नील कापुरे यांनी वेदना व संवेदना कलेच्या माध्यमातून मांडणे हेच खरे आव्हान असल्याचे मत व्यक्त केले।परिसंवादाचे अध्यक्ष शरदचंद्र जाधव यांनी खऱ्या सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांना भिडणाऱ्या कलाकृती निर्माण होणे ही आजची खरी गरज असल्याचे मत मांडले. तर परिसंवादाच्या शेवटी मातीत रुजलेली  व मनातून फुटलेली अस्वस्थ तरुण मने समाजाच्या भावविश्वाला आकार देऊ शकतात असे मत सूत्रसंचालक प्रा लिलाधर पाटील यांनी मांडले

फोटो

अतिशय बहारदार पणे रंगलेल्या अहिराणी परिसंवादात उपस्थित हजारो प्रेक्षकांनी  उभे राहून टाळ्या वाजवून 'स्टँडिंग ऑडिशन'दिली....

छाया ईश्वर महाजन अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.