Halloween party ideas 2015

अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची आज सकाळी अवैध गौण खनिजावर धाड

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यात अवैध गौणखनीजांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू अशा आशयाची माहिती सोशलमिडीयाच्या माध्यमातून माहिती प्राप्त होताच अमळनेरचे कार्यक्षम तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व त्याच्या टिमने आज सकाळीच काही ठिकाणी धाडी टाकत अवैध वाळू पकडण्यात यश आले.त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सविस्तर माहिती अशी कि आज दिनांक १० सप्टेंबर सकाळी पहाटे 3 ते 5 वाजे दरम्यान मांडळ, मठगव्हान व पाडसे येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकड़ले असून पथक मा तहसीलदार अमलनेर श्री मिलिंदकुमार वाघ साहेब तसेच पी एस पाटील मंडळ अधिकारी नगाव बु ,जी आर महाजन तलाठी अमलनेर , हर्षवर्धन मोरे तलाठी हेड़ावे ,आशीष पारधे तलाठी मांडळ धीरज देशमुख तलाठी मठगवहान ,जितेंद्र पाटील तलाठी खैशी प्रथमेश पिंगले तलाठी नगांव बु एम पी भावसार तलाठी पराग पाटील तलाठी पिंटू चव्हाण तलाठी विकास परदेशी तलाठी गौरव शिरसाथ तलाठी प्रकाश महाजन तलाठी प्रदीप भदाने तलाठी संदीप शिंदे तलाठी यांनी सहकार्य केले.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.