*डी सी पी एस धारकांना जुनी पेंशन लागू करण्यासाठी आमदार डॉ सुधीर तांबे साहेब यांना निवेदन*
*-- एन पी एस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी*
नाशिक प्रतिनिधी(रशिद पठाण)
डी सी पी एस धारकांना जुनी पेंशन लागू करून एन पी एस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे साहेब यांना आज दि ९ रोजी संगमनेर येथे विविध संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले,
यावेळी आमदार तांबे साहेब यांनी परिस्थिती लक्षात घेऊन *तत्काळ* *माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर-झनकर मॅडम,वेतन भ,नि,नि अधीक्षक श्री उदय देवरे साहेब* यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून सूचना दिल्या,
तसेच पुढील आठवड्यात *माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम,माननीय शिक्षण आयुक्त श्री विशाल सोळंकी साहेब,शिक्षण संचालक श्री दिनकर पाटील साहेब* तसेच संबंधित विभागांची मीटिंग घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगितले,
यावेळी दिलेल्या निवेदनात एक नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना अंशदायी परिभाषित योजना लागू करून अन्याय केला असून तसेच अनेक वर्षे शिक्षण विभागाच्या दिरंगाईने डी सी पी एस खात्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांत वेतन कपात द्यावी लागली,तसेच स्वतःची जमा रक्कम, शासन हिस्सा, व्याज याबाबत अनेकवेळा लेखी व तोंडी मागणी करूनही शिक्षण विभागाने हिशोब दिलेला नाही,शिक्षण विभाग पगार थांबविण्याची तंबी देत असून जबरदस्तीने एन पी एस खाते उघडण्याची कार्यवाही करत असून सदर बाब गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे, याप्रसंगी *जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एस बी देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री संजय गीते,DCPS संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री गोविंद कांदळकर,श्री रशीद पठाण,पत्रकार श्री राहुल दवते आदी उपस्थित होते,*
