Halloween party ideas 2015

अमळनेर प्रतिनिधी
आर के नगर परिसरात पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत परिस्थतीची माजी आमदार साहेबराव पाटिल यांनी पहाणी केली पुन्हा प्रांताधिकारी , तहसीलदार व मुख्याधिकारी,यांच्या लक्षात परिस्थिती चे गांभीर्य आणून देत. तात्काळ तिसऱ्या दिवशी आर के नगर परिसरात उपाययोजनांना सुरवात करण्यात आली आहे.
नगरपालिकेचे पालक नेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आज न पा चे बांधकाम अभियंता आणि मुरूम चे ट्रॅक्टर, डंपर असा लवाजमा घेऊन आर के नगरच्या भागात धडक देत कामाला सुरुवात केली.स्वतः सलग ३ ते ४ तास भर उन्हात थांबून स्थानिक नागरिकांच्या सोयीनुसार ७० वर्षाचा उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण मनाचे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी प्रत्येक भागात स्वतःच्या देखरेखीखाली तात्पुरत्या उपाययोजना ची अंमलबजावणी आज सुरू केली.
यावेळी सोबत नगरसेवक राजेश पाटील, नगरसेवक श्याम पाटिल,बांधकाम अभियंता भामरे यांचे सह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे , नांन्द्रे सर, देसलेबाबा, भूषण भदाणे आदिंसह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते.
सदर परिसरात तात्काळ मुरूम टाकून तात्पुरते रस्ते वापरायला उपलब्ध करून दिले तर साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी भर टाकून व्यवस्था करण्यात येत आहे. मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या धडाकेबाज कार्यपद्धती बद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे तर तरुणांना लाजवेल असे काम कोरोना साथीच्या काळात नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल हे स्वतः तासंतास थांबून करून घेत असल्याचे चित्र पाहून नागरिक ही अचंबित आहेत.




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.