Halloween party ideas 2015

अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर तालुक्यातील जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते.याबाबतीत कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव तसेच शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
   ७ सप्टेंबर रोजी  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा पार पडली. यात २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या शासनाकडून सादर करण्यात आल्या.त्यापैकी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी रुपये १५ हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.त्या आर्थिक तरतुदीतून जळगाव जिल्हा व अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी जून ते सप्टेंबर २०१९ अखेर झालेल्या नुकसानीचा देखील समावेश करण्यात यावा अशी मागणी साहेबराव पाटील यांनी केलेली आहे.
  त्यांनी शासनाला तसे प्रस्ताव वेळोवेळी सादर केलेले आहेत.तसेच शासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर १५ ऑगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील पाठवले होते.याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळीच पाऊले उचलत बाधित शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून केंद्रशासनाला नैसर्गिक आपत्ती च्या निकषानुसार जिराईत क्षेत्रकरीता ६८००₹, बागाईत क्षेत्रकरीता १३५००₹ व फळबाग क्षेत्रकरिता १८०००₹ रुपये मिळावेत असा प्रस्ताव शासनाला सुपूर्द केलेला होता, लवकरात लवकर अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्यामुळे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यावेळी उपोषण संस्स्थगीत केले होते.
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील माजी आमदार कृषिभूषण यांच्या पत्राची दखल घेऊन २१ जुलै व ३ सप्टेंबर रोजी पत्र काढून प्रशासनाला योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.साहेबराव पाटील यांच्या या कार्यतत्परतेमुळे अमळनेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

   "शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तर मिळायलाच हवी त्या पाठोपाठ जून ते सप्टेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा देखील योग्य मोबदला दिला गेला पाहिजे."असे
माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.