कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना पाच लाखांची मदत करावी आवास संस्था ची मागणी
अमळनेर प्रतिनिधी
कोरोना बाधित मृत्यूच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी चे निवेदन आवास संस्था तर्फे उपविभागीय अधिकारी उप विभाग अमळनेर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले
शहरातील आवास बहुउद्देशीय संस्थेचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या देश सह राज्यभरात कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातले आहे राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढत आहेत लाँकडाऊन लागले तेव्हा पासून उद्योग धंदे व रोजगार कमी झाले आहे अश्या परिस्थितीत ज्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे मृत्यूच्या वारसांना शासनाने तातडीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी आवास संस्था अध्यक्ष अशफ़ाक शेख , नविद शेख , अफसर पठान , अँड साजिद शेख , मजहर शेख , अहेमद अली सैय्यद , जमालोदीन शेख ,अमजद अली शहा , जाविद पेन्टर , करिम बागवान ,सह आदींचे स्वाक्षऱ्याने निवेदन देण्यात आले