*अमळनेरला भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे गुणवंतांचा सत्कार*
*अमळनेर* - कोरोनाच्या संक्रमनामूळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही; मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून अमळनेर तालूका युवा परिषदेने फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या प्रथम ३ क्रमांकाच्या अशा १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला,
फिजीकल डिस्ट्न्स पाळुन हा कार्यक्रम घेण्यात आला,
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढुन पुढिल काळात चांगले यश मिळण्याची उर्जा मिळाली,
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन व माल्यार्पण करून झाली,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्थ वसुंधरा लांडगे होत्या,
अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना संगत चांगली असावी, कारण आपली चांगल्या व्यक्ती सोबतच्या संगती मुळेच आपले जिवन घडत असते, तसेच विवीध प्रसंगांच्या माध्यमातून योग्य संगत असल्यास मनुष्य चांगला घडतो हे स्पष्ठ केले,
प्रमूख पाहुणे म्हणून युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर होते,
याप्रसंगी व्यासपिठावर तालूकाध्यक्ष संदीप पाटील, तालूका उपाध्यक्ष अंकीता पाटील, तालूका महासचिव योगेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते,
उपस्थित मान्यवरांनी दहावी व बारावीत यश संपादन केलेल्या वैष्णवी शरद पाटील, भावेश्री प्रसाद जोशी, तेजस्विनी राजेंद्र पाटील, मनीष मंगेश सोनार, स्वप्नाली ज्ञानेश्वर पाटील, जागृती गुलाब लांडगे, चैतन्य धनंजय महाजन, कल्याणी जयवंत पाटील, मयुरी विठ्ठल बारी, पूजा विकास बारी, मोहित भैय्यासाहेब पाटील, मानस ज्ञानेश्वर पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, पेन व गुलाबपुष्प देऊन गौरविले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,
उपक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील यांनी पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील, जिल्हा महासचिव दिव्या भोसले यांचे मार्गदर्शन लाभले,
कार्यक्रम यशस्वितेसाठी तालूका सचिव मयुरी दिनेश माळी, राकेश पाटील, तालूका समन्वयक दिपक महाजन, भाग्यश्री कासार यांनी परिश्रम घेतले,
कार्यक्रमास पत्रकार सागर मोरे, सामजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले, तर आभार मयुरी माळी यांनी मानले,