मआविम चे गट आता समाज सहाय्य गट होताय"* अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे
अमळनेर (प्रतिनिधी)
महिला आर्थिक विकास महामंडळच्या अध्यक्षा श्रीमती.ज्योती ताई ठाकरे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते आज अमळनेर येथे प्रेरणा लोकसंचलीत साधना केंद्राचे उदघाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी बचत गटांच्या स्टॉल ला भेटी देऊन, बचत गटांनी कोरोना व लॉक डाउन च्या काळात केलेली कामे याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.बचत गटातील महिलांनी देखील आपण मआविम च्या माध्यमातून कशा प्रकारे आत्मनिर्भर झालो याचे दाखले दिले.यावेळी मानव विकास मिशन अंतर्गत तेजश्री फायनान्स योजनांतर्गत लाभार्थी महिलांना धनादेश वाटप करण्यात आले.
ज्योतिताई ठाकरे यांनी आपल्या मनोगतात मआविम ची ध्येय धोरणे स्पष्ट केली.महिलांनी जास्तीत जास्त आत्मनिर्भर झालं पाहिजे.महिलांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनायला हवं, यासाठीच आपण महिलांसाठी आर्थिक महामंडळ स्थापन केले आहे.आज राज्यात बऱ्याच बचत गटांना हिरकणी पुरस्काराच्या माध्यमातून पारितोषिक मिळाले असून त्यात त्यांची प्रगती दिसून येते.आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम होत आहेत.महिलांच्या प्रगतीसाठी मआविम ने व्यासपीठ निर्माण करून दिल आहे,याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अस आवाहन त्यांनी केलं.
यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील यांनी देखील मनोगतातून तालुक्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्थानिक पातळीवर हवी ती मदत करण्याच आश्वासन दिल.
कार्यक्रमाला नाशिक विभागाचे विभागीय मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे,जळगांव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक अधिकारी शेख अतिक,जळगांव जिल्हाचे सहा.जिल्हा समन्वयक अधिकारी युवराज पाटील,लेखा अधिकारी विजय स्वामी,उपजिवीका अधिकारी प्रशांत पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील,तालुका महिला आघाडी प्रमुख मनीषा परब आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रत्ना पाटील आणि आभार सलीम तडवी यांनी मानले.