धुळे प्रतिनिधी
आज दि 12/09/2019 रोजी दुपारी रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार यांच्या तर्फे जाहीर झालेला उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मा. श्री डी. पी. महाले*(अध्यक्ष,नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटना, नंदुरबार)जाहीर करण्यात आला होता. आज नंदुरबार नगर पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात *मा. मेधा ताई पाटकर* (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), *मा. ऍड राजेंद्रभैय्या रघुवंशी*(माजी अतिरिक्त म्हाभियोक्ता भारत सरकार), *मा. रो.अनिश शाह*(असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 3060) *मा. श्री नागसेन पेंढारकर*(अध्यक्ष, रोटरी क्लब नंदनगरी), *मा. श्री मनोज गायकवाड*(सचिव, रोटरी क्लब नंदनगरी), *मा श्री रमाकांत पाटील*(अध्यक्ष संयोजन समिती) , *मा सैयद इससार*(लिटरसी चेअरमन) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार *श्री डी पी महाले यांना वितरण करण्यात आला.* श्री डी पी महाले आपल्या मनोगतात म्हणाले की सदर पुरस्कार मला एकट्याला मिळाला नसून संपूर्ण संघटनेला मिळाला आहे व सर्व श्रेय संघटनेचे आहे, त्यासाठी संघटनेचे व रोटरी क्लब नंदुरबार यांचा आभारी आहे.
सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल अ. शि. मंडळ, धुळे -नंदुरबार च्या अध्यक्षा *मा. सौ. मंगलाताई महाजन, तसेच आधारस्तंभ मा. श्री अरुण भाऊ महाजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री एम व्ही कदम साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी रोकडे साहेब,मा देवरे साहेब , डॉ युनूस पठाण साहेब* तसेच अ शि मंडळाचे सचिव मा श्री आर. व्ही. सूर्यवंशी, जेष्ठ संचालक मा श्री एन. डी. माळी सर, मा आर. बी. कुमावत, प्रा पी. बी. महाजन , प्राचार्य श्री अजित टवाळे सर , तळोदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा श्री निमेश दादा सूर्यवंशी सर, माजी प्राचार्य श्री अरून मगरे सर, माजी मुख्याध्यापक मा. श्री घनश्याम चौधरी सर,माजी उपमुख्याध्यापक मा. श्री संजय माळी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. प्रा. अमरदीप महाजन सर, इंग्लिश मिडीयम प्रमुख मा. सौ शितल महाजन म्याडम तसेच अध्यापक शिक्षण मंडळ परिवार तसेच *नंदुरबार जिल्हा व तळोदा तालुका शिक्षकेतर संघटना या सर्वांनी अभिनंदन केले ...*