Halloween party ideas 2015

लॉकडाउन-एक अविस्मरणीय आठवण



२४ मार्चला पंतप्रधान मोदींनी रात्री आठ वाजता लॉकडाउन एका महिन्यासाठी घोषित केला आणि अचानक पूर्व तयारी नसतांना तोकड़ा सामान घेवून रात्री दहा वाजता गावी निघायचे ठरविले. अनेक अडचणीचा प्रवास करुन पहाटे धुळे येथे पोहचलो. कोरोनाची व पोलिसांची भीती न बाळगता रावसाहेब घ्यायला आले.मनात द्विधा परिस्थिति जायचे कुठे अमलनेर की कलमसरे?शेवटी ठरले की एक महीना आक्का कड़े अमलनेरला राहु व क्वारंटाइन कालावधि संपल्यावर कळमसरे ला जाऊ. मग काय मला बहिण पाहुण्याकड़े,रूपालीला नणद कड़े, मुलांना आत्याकडे महीनाभर राहण्याचा योग आला.सुखात दोन दिवस व दुखात बारा ते तेरा दिवस पेक्षा जास्त दिवस राहण्याचा योग कधीच आला नव्हता.फ़ोन वर एकमेकाची चौकशी करणारे आता एकत्र सहवासात आले होते. आम्हि परीवार म्हणून नव्हे तर एका टीम सारखे राहु लागलो.
आमच्या टीम मधे मी, रुपाली,स्वामी,जानू, आक्का,रावसाहेब,शंतनु व आठ दिवसानन्तर गुड्डी ताई,सनी व आप्पा सामिल झाले.
नैसर्गिक जीवन जगण्यास सुरुवात झाली.स्वयंपाकाची धुरा गुड्डीताई व रुपाली कड़े, गैस वरचा स्वयमपाक चुली वर बनवायला सुरुवात झाली, हीटर ची जागा तपेला ने घेतली, भाजीपालाची जागा दाळी- साळी ने घेतली आणि चपातीचा ताण बर्यापैकी भाकरींनी कमी केला होता.अधुन मधून भाजीपाला व दूध आबांकडून येवून जायचा.
रोज नास्ता,दुपारचे व रात्रीचे जेवण वेगवेगले मेनू.
रोज क्यारम, चौकट चौकट, दोरी उड्या, आंधळी कोशिमबीर, प्राणायाम,योगासन,गुरुपूजा नित्यानेमाने चालू लागले.अधुन मधून आबा ही आमच्या टीम मध्ये सामिल व्हायचे.जानू व स्वामी एबीपी माझाचे अँकर बनून करमनुक करायचे.
मग काय रिकाम्या वेळेस उडीदाचे पीठ कुटने, लाटया बनवने, वडया झारने, शेवया चायने, शेव चा ठसा दाबने असे अनेक कामे करुण जुन्या आठवनींची पुनरावृत्ति झाली.
हे सगळे करता करता डोक्यानचे केस कुठे वाढले कळलच नाहि.मग काय रावसाहेब यांच्या मदतीने घरच्या घरी कटिंग केली.अस करता करता महीना कुठे निघाला कळलच नाहि आणि आम्हि अक्षय्य तृतीयाला (२६ एप्रिल ला) कलमसरे येथे मुक्काम हलवला.
कळमसरे जननी जन्म भूमि,कर्म भूमि त जास्त दिवसाचा मुक्काम राहणार हे जवळपास निश्चितच झाले होते.मग काय स्वामी व जानू गुरं ढोर,बोकड व भांडी बनवने व खेळने मध्ये रमले व आमचा स्वामी तर भवरा फिरवन्यात एक्सपर्ट झाला त्यांनी तर गल्लीत अनेक मित्र बनवले.रुपालीने तर मालकिन सारखे खोळ खोसुन जबाबदारी घेतली व आजिंचे व कुटुंबाची मनापासून सेवा करत होती.घराची जबाबदारी साम्बाळतानाच मुंजोबा, कुवारका, पोळा,भालदेव, गणपती, गुलाबाई, पित्तर पाटा, वाढदिवसाचे केक बनवने अशे अनेक चाली रीतिनचा अनुभव घेतला.एरव्हि अधुन मधून गावुन वर दिसनारी रुपाली सहा महीने साड़ी वर बघून मर्यादेत राहनयाचे कौतुक वाटतं होते.गल्लीत सर्वांचे मन सांभालून न बोलणार्यालाही बोलके केले होते.
मी तर इंजीनियर चा शेतकरी कधी झालो कळलेच नाहि. शेती आणि शेतकरी जवळून पाहिली व अनुभवली.इतरां कडून शेतातले अनुभव घेवून चांगली शेती करण्याचा प्रयत्न केला व तेव्हा समजले की आयुष्यात कलेक्टर होने सोपे परंतु शेतकरी होने व त्यासारखे जीवन जगणे फार कठिण. रिकाम्या वेळेत मंदिरा जवळ बसून थोरा मोठ्यांचे गप्पा एकन्यात कधी रात्रि १२ वाजायचे कळत नव्हते.
शाळेचे शिक्षण सुटल्यानंतर प्रथमच आई वडीलांच्या सहवासात व गावात राहनाच्या प्रसंग आला व सरते शेवटी सहा महिन्यानन्तर १० सेम्प्टेम्बर ला मुम्बई कड़े प्रस्थान झालो तेही जड आंतकरणाने व आठवाणीने...

.प्रमोद चौधरी
अभियंता
कळमसरे ता.अमळनेर



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.