Halloween party ideas 2015

काटे परिवाराने उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

बदलत्या काळात पारंपरिकतेला दिली तिलांजली

अमळनेर (प्रतिनिधी) "देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत" या काव्य पंक्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कृतीतून काटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून एक आदर्श घालून दिला. पारंपारिक गोष्टीला तिलांजली देत बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे.

येथील फ्रुटसेल सोसायटी चे संचालक व ग्रामविकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक प्रतापराव राजाराम काटे यांचे नुकतेच निधन झाले. "ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया असतो; त्यांच्या आयुष्याची इमारत मजबूत असते" याच मूर्तिमंत उदाहरण त्यांचे होते. एक आदर्श शिक्षक, आदर्श व कुशल कुटुंब प्रमुख,कर्तव्य पारायण नागरिक,आदर्श पिता ह्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या. एकूण आयुष्याची 37 वर्ष शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले."एकीचे बळ मिळते फळ" या उक्तीनुसार एकत्र कुटुंब कसे असावे याचे जिवंत उदाहरण त्यांनी घालून दिले.शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शिक्षकाची चवथी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे दोघेही मुले जयेशकुमार काटे व उमेश काटे हे अतिशय नावलौकिकाने चालवीत आहेत. जो आवडे सर्वांना.. तोच आवडे देवाला या उक्तीनुसार अमळनेरला खासगी दवाखान्यात प्रतापराव काटे यांनी 34 दिवस मृत्यूशी झुंज दिली.

"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" हा विचार ते आपल्या कृतीतून जगत होते म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी एक आदर्श घालून दिला. त्यांचा दशक्रिया विधी, उत्तर कार्य व गंधमुक्ती चा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने केले. कोणताही अवाजवी खर्च न करता काटे परिवाराने अन्नदानाचा खर्च सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुमारे एकवीस हजार रुपयाचा मदतीचा धनादेश दिला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले की, काटे परिवाराने पारंपारिक गोष्टीला तिलांजली देत बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे. यावेळी पॉलिटे्निक कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा.एम.आर.काटे, किशोर सोनवणे, यशोदिप सोनवणे, पत्रकार भूपेंद्र पाटील, स्थानिक स्कूल कमेटीचे माजी चेअरमन कांतीलाल काटे, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे, शिवशाही फाऊंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, शिवशाही फाऊंडेशन चे सचिव उमेश काटे आदी उपस्थित होते.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.