Halloween party ideas 2015

जळगाव जि.प.च्या डिजिटल ई-बुक मध्ये उपक्रमशील शिक्षक प्रदिप भदाणे यांच्या उपक्रमाचा समवेश
एरंडोल प्रतिनिधी

उपक्रमशील शिक्षक प्रदिप भदाणे यानी जि.प.शाळा बाम्हणे ता.एरंडोल येथे राबवलेला पर्यावरण पुरक "वृक्षदान अभियान" उपक्रमाचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आयटीसेल च्या "आपला जिल्हा आपले उपक्रम भाग 2 " या डिजिटल ई -बुक मध्ये
समावेश करण्यात आला आहे.
पालक ,नागरीक यानी आपल्या मुलांचा वाढदिवस,आपले पूर्वज यांच्या स्मरणार्थ,घरातील मंगल कार्याच्या प्रसंगी त्या प्रसंगाची आठवण म्हणून संरक्षक जाळी सह 4 ते 5 फूट उंचीच्या रोपासह वृक्षदान करुन त्याचे वृक्षारोपण शाळा,सार्वजनिक ठिकाणे,ग्राम पंचायत अश्या ठिकाणी करने ही उपक्रमातील मुख्य संकल्पना आहे. या उपक्रमा मुळे विद्यार्थी ,पालक ,नागरिक यांच्या मधे पर्यावरण विषयक जाणिव जागृती होऊन वाढदिवसा सारखे कार्यक्रम केक कापुन साजरे करण्यापेक्षा वृक्षारोपण करुन साजरे करण्यास प्रेरणा देणारा आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य ,गावातील जेष्ट नागरिक,तरुण मित्र मंडळ मुख्याध्यापक श्री.नंदालाल पाटील,महाविर भिंगोले,योगेश पाटील,समाधान पाटील यांचे सहकार्य लाभले.यातील 100 टक्के वृक्ष जगले आहेत.या अगोदर श्री.भदाणे यानी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी,"खडाक्षरे",
", मेहु-टेहू(ता.पारोळा) शाळेत "चालता बोलता इंग्रजी","समान्य द्न्यांन प्रश्न मंजुषा ",टाकाऊ पासुन टिकाऊ निर्मित वस्तूंचे प्रदर्शन केंद्र संमेलनात विद्यार्थ्यांची "English Quiz","बोलकी बाहुली" तसेच भोलाणे(ता.पारोळा) शाळेत "हगणदारी मुक्त शाळा परिसर",इंग्रजी शब्द संग्रहा साठी "रंगोली", बंजारा भाषिक विद्यार्थ्यासाठी "गोष्ट तुमची भाषा आमची" असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या उपक्रमांच्या
पहिल्या डिजिटल ईबुकचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी
बी.एन.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस. अकलाडे,उपशिक्षणाधिकारी डी.एम.देवांग या उपक्रमाचे अधिकारीमुख्य सुत्रधार संपादकशिक्षणविस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी
राजेंद्र सपकाळे, प्रवर्तक अरूणा उदावंत, पंकज पालिवाल, राजेंद्र कोळी, आर.आर.पाटील, संदीप पवार, कल्पना पाटील, सोनाली साळुखे, विजया पाटील उपस्थित होते.ईबुक भाग-२ चे प्रकाशन
शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नाविन्यपूर्ण
उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्हाभरातून उपक्रमशील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला."वृक्ष दान अभियान" उपक्रमच्या यशस्वीते बद्दल गट शिक्षणाधिकारी श्री.विश्वासपाटील,शि.वि.अ.श्री.जे.डी.पाटील,केद्रप्रमुख सुनिल महाजन यानी अभिनंदन केले आहे.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.