वैजापूर प्रतिनिधी
दि.१२ सप्टेंबर २०२० रोजी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेशसिंग परदेशी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके,प्रदेश प्रवक्ते प्रा. संतोष विरकर, जिल्हा समन्वयक निशांत पवार,संदीप घोडके, चंद्रकांत पेहरकर, योगेश हेकाडे, विराज घोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,वैजापूर शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड,गटनेते दशरथ बनकर,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरज नाना पवार,सुनिल पैठणपगारे,गोरखनाथ शिंदे,संजय जेजुरकर,उत्तम पवार, डॉ. परेश भोपळे,धनंजय अभंग,रविंद्र पाटणेआदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थितांना संभोधित करतांना म्हटले कि महापुरुषांचे पुतळे उभारण्या मागे एक आचार विचार असतो.त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाने जातींच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे.
याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंचा विजय असो,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय जोती,जय क्रांती अशा प्रकारच्या घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळा उभारणीसाठी खंडाळा गावातील गणेश पवार,तुषार पवार,संतोष गाडेकर,संतोष पवार,कमलेश दारुंटे, सोनू सूर्यवंशी, भागवत बागुल,उमेश दारुंटे या युवकांनी मोठे परिश्रम घेत पुतळा उभारण्यात मोठे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुकताच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गौरविण्यात आलेले मनोज सोनवणे यांनी केले होते तर जाहीर आभार संतोष पवार यांनी केले