Halloween party ideas 2015

पोलिस-समाजातील प्रशासनयंत्रणेचा महत्त्वाचा घटक.

पोलिस हा शब्द शहर किंवा नगरराज्य आणि राज्याची परिस्थिती आणि राज्यघटना या अर्थाच्या ग्रीक (ग्रीक शब्दावरून Polis हे त्याचे रोमन लिप्यंतर) शब्दापासून निघालेला असून तो मुलकी राज्यव्यवस्था या अर्थाने प्रथम फ्रेंच भाषेमध्ये रुढ झाला. सर्व पश्चिमात्य राष्ट्रांत प्राचीन काळापासून नगरपालिका आणि तत्समान इतर स्थानिक स्वराज्य संस्थाचे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्यामुळे कालांतराने "पोलीस" या शब्दाला आधुनिक अर्थ प्राप्त झाला. लोकांच्या जीवितावित्तांचे रक्षण करणे, गुन्हा रोखणे, घडलेले गुन्हे हुडकून काढून आरोपीला पुराव्यानिशी न्यायालयात हजर करणे, समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे इ.कामांचा समावेश पोलिसांच्या कर्तव्यात होतो.
कोणत्याही कालखंडातील पोलिसयंत्रणेचे स्वरूप तत्कालीन राजकीय, तत्त्वज्ञान आणि आर्थिक परिस्थिती यांवर अवलंबून असते. १८२९ साली इंग्लंडमध्येही मेट्राँपालिटन पोलिसदलाची उभारणी करण्याचा कायदा पार्लमेंटमध्ये घेण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणेत खूपच बदल झाला.सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे गणवेश समान ठेवले आहे.गुन्ह्यांच्या आणि इतरही कोष्टकांत एकसूत्रीपणा आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आणि गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी माऊंट अबू व कलकत्ता येथे संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमुणका प्रत्येक राज्य स्वतंत्रपणे करीत असे. पण आता अखिल भारतीय पोलिस सेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले आधिकारीच सर्व राज्यांत नेमले जातात. गुन्ह्यांच्या तपासात विज्ञानाचे साहाय्य मिळविण्याच्या दूष्टीचे शास्त्रीय प्रयोगशाळाही स्थापन झालेल्या आहेत.
स्त्री -पोलिस ही स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाची तरतूद आहे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरात रेल्वे पोलिस खात्यात व बहुतेक सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी स्त्री-पुरुष नेमलेले आहेत. समाजकल्याणाच्या हेतूने केलेल्या " Bombay Children Act" किंवा सप्रेशन आँफ इम्माँरल ट्रँफिक इन वुमेन अँड गल्स अँक्ट "यांसारख्या कायदयांच्या अमंलबजावणीसाठी स्त्री -पोलिसांचा फार मोठा उपयोग होतो.महाराष्ट्र पोलिस दल सामान्यतः इतर राज्यातील पोलिसदलांसारखेच आहे.फरक इतकाच की पश्चिम बंगाल व तामिळनाडू ही राज्य वगळता इतर राज्यात पोलिस आयुक्त नाही.पण महाराष्ट्राच्या तीनही मोठ्या शहरांत मात्र ते नेमले जातात.पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता ,तामिळनाडूत मद्रास व गुजरातमध्ये अहमदाबाद अशा राजधानीच्या शहरात पोलिस आयुक्त नेमलेले आहेत.या आयुक्तांना जिल्ह्यातील अधिक्षकाचे व भरीला जिल्हा न्यायधीशांचेही अधिकार असतात
पोलिस हा राज्यसरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यांना अधिकार आहे.पोलिसांमुळे आपण खूपच सुरक्षित आहोत पण त्यांचे जीवन मात्र असुरक्षित आहे.पोलिस हे कर्तव्यनिष्ठ असतात. ते सर्वप्रथम आपल्या वर्दीला मान देऊन आपले कर्तव्य पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाप्रती जबाबदारी पार पाडतात. पोलिसांना कधीही त्यांच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. एकीकडे सण उत्सव असताना आपण आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत ते साजरे करत असताना दुसरीकडे मात्र आपले पोलिस बांधव हे आपल्या कुटुंबापासून लांब राहून या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपली डयुटी सांभाळत असतात. त्यांना ही वाटत असते आपणही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा परंतु ते नेहमी आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्त्व देत असल्याने अशा पोलिसांचा आदर आपण नेहमी केला पाहिजे.
कोरोनाकाळात सुद्धा आपण सर्वजण आपल्या घरात सुरक्षित असताना आपले पोलिस बांधव मात्र या कठीण परिस्थितीत स्वतः चा जीव धोक्यात घालून आणि आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपली डयुटी योग्य प्रकारे करत होते. यावेळी त्यांना इच्छा असूनही आपल्या कुटुंबाना भेटता येत नव्हते. या कठीण परिस्थितीला तोंड देत असताना अहोरात्र काम करताना काही पोलिस कर्मचाऱ्यांचे निधन झाले, तरीही पोलिस यंत्रणा डगमगली नाही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला नाही.
पोलिस बांधव आपल्यासाठी अहोरात्र झटत असताना काही वेळा त्यांच्यावर दुदैवी हल्ले होतात, काही वेळा अत्यंत हीन दर्जाची वागणूक त्यांना दिली जाते तरीही ते जनतेच्या रक्षणासाठी सतत तत्पर असतात.
जनतेचे जीवन सुरक्षित करुन आपले जीवन मात्र असुरक्षित करणाऱ्या या अशा पोलिसबांधवाचा आपण नेहमी आदर केला पाहिजे. पोलिस जरी हे सरकारी अधिकारी असला तरी तो एक चांगला माणूस असून त्यालाही भावभावना असतात हे मात्र आपण विसरता कामा नये. या लाँकडाऊनच्या काळात अनेक पोलिस बांधवांनी आपल्यातील सुप्त गुण दाखवले.पोलिस सुद्धा एक चांगला कलाकार आहे हे यावेळी त्यांनी दाखवून दिले.
अशा या पोलिस बांधवांना आपण नेहमी सहकार्य करावे. आणि जनतेने सुद्धा आपल्या कर्तव्याचे योग्य पद्धतीने पालन केले पाहिजे जेणेकरून पोलिसांना एक प्रकारे मदत होईल.
पोलिसांच्या या कार्याला आपण सलाम केला पाहिजे.आणि खरोखरच पोलिस हा समाजाचा अविभाज्य घटक आहे

लेखिका.
प्रा.अमिता कदम.
( Venus World School)
हडपसर, पुणे.
9819395788.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.