अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. मनीषा चौधरी यांना जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच ईगल फाउंडेशन मार्फत राष्ट्रीय गरुळझेप पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीमती चौधरी ह्या गेल्या 19 वर्षांपासून शिक्षिका म्हणून आपले कार्य पार पाडत आहेत. आणि आपल्या शीक्षकी जीवनात त्यांनी अनेक सामाजिक कार्य करीत अनेक पुरस्कार देखील प्राप्त केली आहेत. त्यांनी शैक्षणिक दत्तक पालक योजनेअंतर्गत 11 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च केला आहे तर मोफत सॅनेटरी पॅड बॅक- जैतपिर केंद्रातील माध्यमिक शाळेतील मुलींना तसेच मंगरूळ माध्यमिक शाळेतील मुलींसाठी मोफत सॅनेटरी पॅड बॅक सुरू केली, सन 2016 पासून त्यांनी विविध शाळेत रूबेला लसीकरण शिबीर घेऊन जवळपास 500 विद्यार्थीनींना लसीकरण केले, साने गुरुजी वाचनालयात चालू केलेल्या मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस साठी दरमहा 2000 रू ची देणगी त्या देत असतात, जवळपास दरमहिन्याला 400 मुलींना मोफत सॅनेटरी पॅड त्यांच्या मार्फत वाटप केले जातात, साने गुरुजी वाचनालयास वाढदिवसानिमित्त 5000 रू ची पुस्तके त्यांनी आज पर्यंत भेट दिली आहेत, इ.1ली ते 12 वी पर्यंतच्या प्रथम 3 विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील त्या करतात, गरजू हुशार विद्यार्थीनी ची MSC ला प्रवेश करून शैक्षणिक जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांना त्यांच्या या कार्यासाठी साने गुरुजी वाचनालयाचा कार्यगौरव प्रेरणा पुरस्कार, तहसील कार्यालयाचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार, तेली समाज मंडळाचे सन्मान पुरस्कार, माजी आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराकडून गुणगौरव सोहळ्यात गुणगौरव सन्मान पत्र देऊन सत्कार, ओबिसी विद्यार्थी शिक्षक पालक असोसिएशनचा नाशिक विभाग स्तरीय गुरू गौरव पुरस्कार, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार, प्रजापिता ब्रम्ह कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय जळगाव यांचेकडून बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सन्मान पत्र असे त्यांना त्यांच्या कामानिमित्त पुरस्कार आज पर्यंत मिळाले आहेत. तसेच आता जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय गरुळझेप पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीमती चौधरी यांना चांगल्या कामासाठी वेळोवेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चौधरी व शाळेचा स्टाफ यांनी मार्गदर्शन केले . त्यांना हे पुरस्कार मिळाल्या बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, गट शिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, शिक्षणाविस्ताराधिकारी ,मुख्याध्यापक मधुकर चौधरी व शाळेतील स्टाफ,अध्यक्ष व संचालक मंडळ सानेगुरुजी वाचनालय व ग्रंथालय व मोफत वाचनालय व सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर यांनी अभिनंदन केले आहे.
*शिरसाळे ता.अमळनेर येथील उपक्रमशील शिक्षिका मनिषा चौधरी यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका व ईगल फाऊंडेशनचा राष्ट्रीय गरूडझेप पुरस्कार जाहीर, सर्वत्र अभिनंदन!*
अमळनेर प्रतिनिधी
