पांझरा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अक्कलपाडा धरणाचे 3 दरवाजे खुले
प्रतिनिधी अमळनेर
अक्कलपाडा धरण 100 टक्के भरल्याने पांझरा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असून काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काठावरील गावकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेल्या अक्कलपाडा धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री 10 वाजता या धरणातून 3 दरवाजे खुले करण्यात आले असून त्यातून 3200 क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा प्रकल्पातुन सुरू आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर तालुक्यातील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन. महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
