Halloween party ideas 2015

महाराष्ट्र पोलीस खात्यातील IPS आधिकारी संदीप पाटील यांच्याबद्दल वरिष्ठ पत्रकार सामाजिक व राजकीय नेते ज्यांचा संपादकीय आर्टिकल नेहमी मंत्रालय मधील सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी व मंत्रिमंडळ मधील अनेक मंत्री राज्यातील अनेक विचारवंत,नेते मंडळी आवर्जून वाचतात असे अनिल महाजन हे काय म्हणतात वाचा सविस्तर.....

*महाराष्ट्र पोलीस खात्यात पुणे ग्रामिणचे अगोदरचे पोलीस आधिक्षक व सध्या उपमहानिरीक्षक गडचिरोली संदीप पाटील यांच्या सारखे अनेक आधिकारी अजूनही आहेत म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्याची प्रतिमा उच्च शिखरावर पोहचत आहेत.*

आमचे मित्र आणि सध्याचे पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र गडचिरोली संदीप पाटील IPS आधिकारी यांची चांगल्या कामाची पावती ही खरोखर समाजाच्या हिताची आहे. पोलिस म्हटले की सर्व सामान्य व्यक्तीच्या अंगाला काटे येतात आणि हल्ली पत्रकार आणि पोलिसांचे मुळीच जमत नाही परंतु पोलीस खात्यात संदीप पाटील यांच्या सारखे आधिकारी असल्यावर नक्कीच यांच्या बदल्या झाल्यावर यांची उणीव भासते.
सातारा,पुणे पोलिस आधिक्षक म्हणून अतिशय कर्तव्यदक्ष काम संदीप पाटील यांनी केले आहे. कायदा सुव्यवस्था आणि कर्मचारी या दोघांना कसे सांभाळावे हे पाटील साहेबांन कडून शिकण्यासारखे आहे. शासकीय नौकरी म्हटली की बदली हा विषय पाचवीला पुजलेला असतोच तो काही नवीन नाही पण संदीप पाटील साहेब यांची पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक या पदावरून पदन्नोती झाली आहे. प्रमोशनवर त्यांना गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे. या अगोदर २०१४-२०१५ या वर्षांत ही गडचिरोली येथे यांनी उत्तम सेवा बजावली आहे. गडचिरोलीला बदली झाली म्हटलं तर पोलीस खात्यातील अनेकांना अंगाला काटे येतात पण संदीप पाटील साहेबानी स्वतःहून गडचिरोली येथे प्रमोशनवर बदली ही मागून घेतली आहे. प्रामाणिक आधिकारी म्हणून आज पोलीस खात्यात त्यांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस खात्यात संदीप पाटील यांच्या सारखे कर्तव्य दक्ष.अनेक आधिकारी आहेत उदा. श्री.कृष्णा प्रकाश-पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड ,श्री.अशोक दुधे-पोलीस उपायुक्त नवी मुबंई. श्री.प्रमोद शेवाळे- उपायुक्त उल्हास नगर, श्री. सुनील भारद्वाज- व्हीजिलेनस चीफ फूड- एन्ड ड्रग्स वांद्रे,श्री.सचिन गोरे-अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव,श्री.अनिल कुंभारे-एडिशनल कमिश्नर ठाणे,श्री.विश्वास पांढरे, मुबंई श्री.प्रदीप सावंत-सिक्युरिटी विभाग मुबंई अजून असे अनेक आधिकारी आहेत. त्यांचे सर्वाचे नाव आर्टिकल मध्ये घेणं शक्य नाही ज्यांच्या मूळे महाराष्ट्र पोलीस आणि मुबंई पोलीस यांची मान उंचावली आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात या अधिकाऱ्याचा हातखंडा आहे. पोलीस खात्यातील माणुकीची दर्शन घडवणारे सामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाहीतर आदर निर्माण करणारे आशा सर्व IPS अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम.

*आपला*
*अनिल महाजन*
*प्रदेश अद्यक्ष वेब मीडिया असोशीएन मुबंई*
*9967717171*


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.