आयपीएलच्या लौकिकावर शितोंडे उडविणारे सिनेतारकांचे कारनामे
सन २००८ पासून आयपीएलला सुरुवात झाली. त्यानंतर आयपीएलने स्वतःचा लौकिक उंचविण्यास सुरूवात केली. आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय व ग्लॅमरस स्पर्धा म्हणून गणली जाऊ लागली. पण त्याच बरोबर वादाचे विषय वाढायलाही सुरूवात झाली. आयपीएलचा प्रसार व प्रचार वाढत्या भाजणीने जात असताना सिने जगतातील नामवंत तारे तारका या लिगशी जोडायला सुरुवात झाली. परंतु या कलावंतांचा क्रिकेटला त्रास व्हायलाही सुरुवात झाली. हेच कलाकार मंडळी वादाच्या मुद्दयात अडकायला सुरूवात झाली.
आजच्या या लेखात आपण ज्या चित्रपट कलावंतामुळे आयपीएलच्या नावाला काळीमा फासली त्या वादग्रस्त मुद्दयांवर एक झलक मारू या.
आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा मालक अभिनेता शाहरूख खान एका छोटया वादामुळे मोठया वादात अडकला. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स व केकेआर सामन्याप्रसंगी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी व शाहरूख खान यांच्यात वादावादी झाली. सुरक्षा रक्षक नियमाप्रमाणे आपले कार्य करत असताना शाहरूखने मुजोरी केली. अखेर स्टेडीयम प्रशासन व आयपीएल कौन्सीलने सख्त कारवाई करत शाहरूखला वानखेडे स्टेडियमवर जाण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती.
चित्रपट अभिनेता विंदु दारा सिंग याला २२ मे २०१३ रोजी सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. ४ जून २०१ु रोजी त्याला जामीन मंजूर झाला. विंदूची चौकशी केल्याानंतर चेन्नई सुपर किंग्जचे मालक व बीसीसीीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांचे नाव उघड झाले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हाच विंदू दारासिंग मयप्पन साठी सट्टेबाजी करायचा. हा विंंदू दिवंगत अभिनेता व मल्ल दारासिंगचा मुलगा आहे.
चित्रपट अभिनेत्री व किंग्ज इलेव्हन पंजाबची सहमालकीण प्रिति झिंटा व सहमालक नेस वाडीया यांचे भांडण सन २०१३ मध्ये विकोपास गेले होते. त्यानंतरच्या सन २०१४ च्या सत्रात त्या दोघांतील वाद अतिशय विकोपास गेला. नेस वाडीयाने तर प्रितीला भर माणसात जिवे मारण्याची धमकी दिली. सत्राच्या समाप्तीनंतर प्रिती झिंटाने रितसर कायदेशीर कारवाई केली होती. वाडीयाने पुढे जात या घटनेलाच नकार दिला होता.
चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांची मालकी असलेल्या राजस्थान रॉयल्सला मॅच फिक्सींग व भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले. आयपीएल संचलन समितीने चेन्नई व राजस्थानला दोन वर्ष खेळण्यास प्रतिबंध केला होता.
यासह अनेक असे प्रसंग आहेत की चित्रपट कलाकारांनी स्वतः बरोबरच आयपीएलचे नाव बदनाम करून घेतले.
लेखक : -
डॉ. दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
