Halloween party ideas 2015

अमळगांव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळगांव केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली. सदर परिषदेच्या अध्यक्षस्थानी अंतुर्ली / अमळगांव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.गोकूळ पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डायट जळगाव चे अधिव्याख्याता मा.डॉ.राजेंद्र महाजन सर , अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन साहेब अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.धनगर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरुवार दि.27-8-2020 रोजी गुगलमीटद्वारे अमळगांव केंद्राची केंद्रस्तर ऑनलाईन शिक्षण परिषद पुष्प-1ले मा.श्री.गोकूळ पाटील केंद्रप्रमुख,अमळगांव यांचे अध्यक्षतेखाली गुंफण्यात आले. सदर परिषदेची वेळ स.12:00 ते 2:00 अशी दोन तासांची होती. त्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगांव द्वारा निर्गमित ऑनलाईन शिक्षण परिषदे बाबतच्या पत्रानुसार
1) कोवीड19 काळातील माझ्या शाळेतील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण व
2) कोविळ काळातील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाच्या सर्वोत्तम उपक्रम चर्चा व संकलन याविषयी केंद्रातील शाळानिहाय आढावा घेण्यासाठी सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम तंत्रस्नेही शिक्षक व मिटींगचे होस्ट श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुगलमीट द्वारा ऑनलाईन उपस्थिती व आवश्यक खबरदारीबाबत माहिती सांगून ऑनलाईन परिषदेस सुरुवात केली. त्यानंतर ऑनलाईन परिषदेच्या उद्देशाबाबत माहिती सांगून विषयतज्ञ श्री.देवेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.
केंद्रप्रमुख मा.गोकूळ पाटील यांनी केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे प्राथ. व माध्य. मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेऊन परिषदेच्या उद्देशानुसार शाळानिहाय ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाबाबत आढावा घेऊन शाळापातळीवर राबवत असलेल्या शिक्षण प्रक्रियेबाबत व इतर सर्वोत्तम उपक्रमाबाबत शाळानिहाय सादरीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार शाळा बंद पण शिक्षण सुरु, वर्गनिहाय वर्गशिक्षकांनी तयार केलेले व्हॉटस् अप गृप, दिक्षा अॅपचा वापर, टी.व्ही., रेडिओ, साधा फोन व अॅण्ड्रॉईड फोन इ.द्वारा पालक विदयार्थी यांचेशी संपर्क, पाठयपुस्तकांचा वापर करुन विदयार्थी स्वयंअध्ययन, ऑनलाईन स्वाध्याय देणे, ऑनलाईन टेस्ट, अध्यापनाचे व्ही.डी.ओ. बनवून गृपवर टाकणे, स्वाध्याय पत्रिका तयार करून विदयार्थ्याना वाटप करुन सोडवल्यावर जमा करून तपासणे इ संसाधनाचा वापर व वेगवेगळ्या उपक्रमांद्वारा कोविड 19 च्या काळात शैक्षणिक कार्य सुरु असल्याबाबत मुख्याध्यापक-शिक्षक यांनी आपल्या सादरीकरणातून सांगितले. वर्गाचे व्हॉटसप गृपचे नांवे फारच छान दिलेले आहेत ज्ञानगंगा , ज्ञान सरिता , माझा वर्ग माझे विदयार्थी , ज्ञानामृत गृप , छ. शिवाजी महाराज गृप , मोगरा गृप इ शाळानिहाय सादरीकरणात श्री. रविंद्र चव्हाण , गुलाब शिरसाठ दोधवद, भगवान पाटील ,किरण पाटील पिंपळी , पंकज शिसोदे खवशी , श्रीम पूनम पाटील खवशी , प्रविण पाटील , रविंद्र पाटील पिंगळवाडे , पंडित सोनगिरे खेडी खु॥ , श्रीम सुवर्णा वाणी , मनोहर पाटील मेहेरगांव , श्रीम सुनंदा पाटील , श्रीम जयश्री पवार , सुनिल पाटील जळोद, श्री गोकूळ साळुंखे , सतिष पाटील , प्रेमराज पवार कलाली , श्री मगन चौधरी , ज्ञानेश्वर कुवर , प्रदिप महाजन निंभोरा , श्रीम सुरेखा पाटील , संजय शिंदे गांधली पिळोदे इ. शिक्षकांनी आपापल्या वर्गासाठी सुरु असलेल्या शिक्षण प्रक्रियेबाबत सादरीकरण केले. यावेळी प्रमुख अतिथी तथा अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.धनगर यांनी कोविड काळातील विविध शाळांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे कौतुक करुन वैश्विक आपत्तीच्या कालावधीत घ्यावयाची विशेष काळजीबाबत मार्गदर्शन केले. आयडी समन्वयक श्री.युवराज चौधरी यांनीही दिव्यांग विदयार्थ्यासाठी असलेल्या विविध योजना व शैक्षणिक पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अंतुर्ली केंद्राचे केंद्रप्रमूख गोकूळ पाटील यांनी सर्व संसाधने, शाळा बंद पण शिक्षण सुरु, ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन अध्यापन, विदयार्थ्यांचे अध्ययनातील सातत्य टिकवणे, आई-वडिल, पालक, मोठे भाऊ, यांचेशी संपर्क, चर्चा, समुपदेशन करून अभ्यासाविषयी मार्गदर्शन तसेच कोवीड19 विषयी म . जिल्हाधिकारी सोा. यांनी दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही व्हावी 100 % विदयार्थ्यांपर्यंत कसे शिक्षण प्रक्रिया पोहचवता येईल याचे नियोजन, 15 जून पासून आपापल्या वर्गासाठी केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल आपल्यास्तरावर ठेवावा. कोविड19 काळातील Lokdown व Unlock परिस्थिती असतांना शैक्षणिक प्रक्रिये संदर्भात शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित 7 परिपत्रकांची माहिती व त्यानुसार शाळा पातळीवर करावयाचे नियोजन तसेच अंमलबजावणी इ बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.
     सदर शिक्षण परिषदेस केंद्रातील सर्व जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक असे 49 शिक्षक व माध्यमिक/आश्रम शाळांतील मुख्याध्यापक, उपशिक्षक असे 8 शिक्षक, तसेच विषयतज्ञ श्री.देवेंद्र पाटील, श्री.तुषार बाविस्कर, श्री.प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रविण पाटील पिंगळवाडे शाळा यांनी केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.