आनंद आनेमवाड यांचे अँनिमेटेड व्हिडीओ निर्मिती प्रशिक्षण जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी*
*उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांचे प्रतिपादन*
शिक्षण विभागाच्या ऑनलाईन वेबिनार ला चारशे शिक्षकांची उपस्थिती
जळगाव प्रतिनिधी -क्रिएटिव्ह टीचर्स क्लब जळगाव, तंत्रस्नेही शिक्षक ग्रुप जळगाव आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन शिक्षण कसे द्यायचे त्यासाठीचे मार्ग शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन वेबिनार द्वारे शिक्षक प्रशिक्षण सुरू झाले आहे.त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत असून दि 9 रोजी सातव्या सत्रात पालघर येथील राज्यस्तर प्रशिक्षक आनंद आनेमवाड यांनी अँनिमेटेड व्हिडीओ निर्मिती या विषयावर शिक्षकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आनंद आनेमवाड यांचे अँनिमेटेड व्हिडीओ निर्मिती प्रशिक्षण जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. सुमारे चारशे शिक्षकांनी या प्रशिक्षणात स्वेच्छेने सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील , बी जे पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक ,बी एस अकलाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार , किशोर वायकोळे, राहुल चौधरी सर, प्रभात तडवी सर या वेबिनार साठी परिश्रम घेत आहे. त्यांना मनोहर तेजवाणी, संभाजी हावडे, सुनील बडगुजर, भूषण महाले, संदीप सोनार सहकार्य करत आहेत.
फोटो