फार्मसी कृती समितीकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.
अमळनेर प्रतिनिधी
राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थ आहोत असं जाहीर केल्यानंतरही केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली आहे यामुळेच सर्व विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भीतीचे संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
केंद्र सरकारने जरी परीक्षेसाठी परवानगी दिली असती तरी महाराष्ट्र राज्य सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करा या मागणीवर ठाम आहे. आज महाराष्ट्र मध्ये २११९८७ इतकी कोरोणा रुग्णांची संख्या आहे अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे शक्य आहे का?? हा विचार केंद्र सरकारने करायला हवा. एकीकडे लोक एकत्र यायला नको म्हणून लॉकडाउन वाढवायचा आणि दुसरीकडेविद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या जिवाला आणि पोचवायची यात कसला आलं शहाणपण हे देखील केंद्र सरकारने स्पष्ट करायला हवं.
या निर्णयाविरोधात अच येणाऱ्या 13 जुलै रोजी फार्मसी कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा फार्मसी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष आकाश हिवराळे, उपाध्यक्ष परमेश्वर खाकरे-पाटील यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हातात मेणबत्ती व तोंडावर पट्टी बांधून सोशल मीडियावर राज्यभरातील विद्यार्थी निषेध व्यक्त करणार आहेत.
यासाठी सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी व पालक यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत.
आंदोलनाबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला
इंस्टाग्राम- Pharmacy kruti samiti ,
Facebook- Pharmacy kruti samiti तसेच तुम्ही प्रत्यक्षपणे कॉल करू शकतात.
*केतन देवरे (जिल्हाध्यक्ष फार्मसी कृती समिती जळगाव जिल्हा)*
पत्ता - अमळनेर ता. अमळनेर, जि. जळगाव
*मो. 9175524947*