पांचट कोरोना आणि जगण्याचा सत्यानास
लोकपत्रकार
भागवत तावरे
9613331111
टाळ्या वाजवा वाजवल्या , थाळ्या वाजवा बडवल्या , शंख फुंकला मेणबत्या पेटल्या तब्बल चार महिने आमची यंत्रणा आम्हाला कोरोनाच्या विरोधात नेमका मार्ग सांगू शकली नाही हे वास्तव आहे . भारत दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे कोरोना आपल्या गतीने चालत असेल तर आम्ही का थांबलो आहोत , म्हणजे कोरोना होणारच असेल तर धंदे बंद करून जगण्याचे वांदे करून घेणे म्हणजे मूर्खपणा तर नाही ना ? कुठल्याही तर्कात न बसणारा लॉकडाऊन हा आमच्या जगण्याची चेष्टा तर नाही ना , आर्थिक पेंगाळलो असताना हा कोरोना आमच्या मानसिक परिघात जाऊन जगणे निरस करणार असेल तर आम्ही केवळ पाहत राहायचे . कोरोनाचा मृत्यू दर ३ टक्के आहे म्हणजे ९७ टक्के जगण्याचीच हमी , मात्र त्या न थांबणाऱ्या कोरोनाला कैद करण्यासाठी आम्हीच भिंतीबंद होणे आंधळ्या कोशिंबिरी सारखे आहे . कोण मायचा लाल आहे त्याने तरी पुढे येऊन सांगावे कि अजून तीन वर्षे घरात बसलात तर कोरोना जाईल , म्हणजे नेमका कसा होतो कसा होत नाही याचा नेमक सूत्र नाही , रुग्णासोबत असलेल्या लोकांना होत नाही आणि काहींना होतो तर त्यांना कुणापासून झाला हे माहित नाही . कोरोना निसर्गाची क्रूर चेष्टा आहे हे नाकारता येणार नाही मात्र त्या चेष्टेत आमचे कुठवर हसे करायचे हे आम्ही ठरवले पाहिजे , नाहीतर कोरोनाने कमी आणि कोरोनामुळे लोक जास्त मरायची . नाहीतरी कोरोनाचा परिणाम किती लोकांना जीवघेणा ठरला कुणास ठाऊक . बाकी हे बरे काहीही विचारायचे नाही , तिजोरी खडखड वाजली कि दारू विकायला सरकार अनलॉक करणार आणि हातावरच्या पोटांचे लॉक डाऊन करणार , शेतकरी तर पाक मेला ,लॉकडाऊन असले कि मग त्याने कशाला शहरात यायचे , विमा कंपनी नाही , बोगस बियाणे बद्दल बोलायचे नाही शेतातला भाजीपाला सडू द्यायचा अन काय करायचं तर कोरोना रोखायचा , रोखला का तर देश जगात तिसऱ्या , महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे . कोरोना म्हणजे साक्षात यम असल्याचे दाखवण्यात आमच्या वृत्त वाहिन्या पोटभर यशस्वी झालेल्या असल्या तरी कोरोना वार्डात एखादा निवेदक दोऱ्यावर पाठवावा , लोक कसे सहज कोरोना लोळवतात हे दिसेल अंडे आणि सातळ खाऊन आणि हळदीचे दुध पिऊन सुमार शस्त्राने कोरोना निगेटिव्ह होत असेल तर एवढे कोरोना पासून तरी दूर का पळाव ? शफिक भाऊ काल निगेटिव्ह आले त्यांना जरा खाजगीत जाऊन विचारले तर ते सांगतील कोरोणाचा पराभव किती सहज अन सोपा आहे , मग कोरोनाचा बागलबुवा कशासाठी . हळदीचे दुध अंडे मिसळ काय घरी घेता येणार नाही का , रोग होण्या पूर्वीच काय करता येऊ शकते याच एखाद सूत्र काढावं कि नाही , येऊन जाऊन चला चला बंद , आणि धंदे बंद केले तरी काय आउटपुट, तर भारत जगात दुसरा . कोलंबसच्या अमेरीकेने घाट्यातली माघार अमान्य केली , होऊ द्या कोरोना म्हणणारे देश या जगात आहेत आणि सामुहिक प्रतिकार शक्तीने कोरोना ला हरवणारे देखील . सामान्य मानसिकतेला असह्य अश्या अटकली समोर येत आहेत , रामदेव बाबा पत्रकार परिषद घेऊन सांगतात सापडले रे लगेच सरकार म्हणते नाही रे , मध्येच चीन चे गाणे येते , आमचे पंतप्रधान लाईव्ह येऊन काय सांगतात आता त्याला फारसे कुणी ऐकून घेत नाही . मध्येच सांगितले जाते कि १५ ऑगस्ट लस येणार नंतर कळते २०२१ उजाडेल . काय खेळ लावलाय किव यावी असा हा चातुरमास आमच्या उरावर नाचवला आहे . उसंत मिळावी यंत्रणा संशोधकांना आणि लोकांना दिशा देण्यात किवा दक्ष करण्यात वेळ मिळावा लॉकडाउन चे पहिले अंक स्वागताहर्य होते मात्र कायम लॉकडाऊन केल्याने तुमची कम्युनिटी संसर्ग रोखला जाईल याची खात्री कोण देणार . पोलिसांच्या काठीला सुद्धा आता उसंत हवी असेल . लोक पागल होतील घरात बसून , भिंती खायला उठतील ज्यांचा कोरोना १० दिवसात बरा होतो किवा होऊ शकतो त्यांना सोडा , खोड आणि किलबिल मागच्या वडीत ढकला मात्र लोकांना काम करू द्या , नाहीतर लोक तिसऱ्याच कारणाने मरतील . कुत्र चावल्यावर देण्यात येणारे इंजेक्शन आणि बिस्कीट चा पुढा घ्यायला शहरात एक दुकान उघडी नसेल तर याच साठी केला का मग हा अट्टाहास ? आणि शासन प्रशासन यांनी एक बाब समजून घेतली पाहिजे , तुमच्यासाठी लोक नाहीत लोकासाठी तुम्ही आहात , त्याच लोकांचे जगणे वेठीस धरून कुठले जीवन वाचवता याचा हिसाब द्यावा लागेल . ( हिशेब देखील लिहता आले असते, मात्र दाहकता कळायला नको ) संकट वैश्विक असले तरी लढण्याचे आपआपली मार्ग आहेत , कुठल्या देशात कुठली लस निघते काय , उंदरा पासून माणसा पर्यंत चाचण्या होतात काय , मात्र ठोस मात्र अद्याप निघत नाही , १०५ वर्षाची म्हातारी आणि ३ वर्षाचा चिमुकला देखील निगेटिव्ह होणार असेल तर मग मधला मार्ग का निघू नये . मरणाऱ्या व्यक्तीचे बिल कोरोनावर फाडून आम्ही मृत्यूचे नेमके कारण लोकांना का सांगत नाहीत , कोरोना मुळे माणसे मरतात तर मग सगळीच का मरत नाहीत , संसर्ग स्पर्शाने होतो तर मग रुग्णासोबत दोन दिवस असणारा निगेटिव्ह येतो कसा ? एकूण कोरोना लढाई म्हणजे बावळ्याचा बाजार नाही काय ? मरणारा आकडा धडकी भरवनारा असतो , माणसात माणूस राहिला नाही , मंगळावर प्लॉटिंग करणाऱ्या जगाला कोरोनाच्या अदृश्य विषाणूने नाकात दम आणलाय , पराधीन निराधार असलेल्या अहंकारी फुशारकीला आकाशगंगेत फिरकावून एकतर आमच्या आरोग्य यंत्रणेचीच नाही तर एकूण विज्ञान तंत्रज्ञान ज्ञानाची पोलखोल केली आहे . आम्हाला मंगळ नको आमची पृथ्वीच हवी आहे आणि ती केवळ विश्वासाने मिळू शकते , निगेटिव्ह ज्यातून होते ते आमच्याकडे मुबलक आहे सकाळ संध्याकाळ दुध ढोसू , हळदीचे काढे पिऊ मात्र यापुढे घरात बसने म्हणजे भित्री भागूबाईसारखे आहे असे आम्ही मानु . लोकांना पूर्ण स्पष्ट मार्ग दाखवता येत नसेल तर लोकांना त्यांची प्रतिकार शक्ती आजमु द्यावी त्यांचा अंत नाही पहावा ?
......................
*हातावरच्या पोटांना पायबंद*
येऊन जाऊन लॉकडाऊन आला कि गरिबांचे मरण येते , काही ज्ञानी मनुके खात खात लॉकडाऊन असला पाहिजेचे अनुमोदन देतात , त्यांचा काही दोष नाही हातावर पोट म्हणजे काय हे त्यांना ठाऊक असण्याचे काही कारण नाही . केळाचा गाडा ढकलून केले लो म्हणायला लाज वाटेल , गावाकडून दह्याचे हंडे घेऊन आलेल्या कास्ठ्यावाल्या माईची भ्रांत खिडकीत खिचडी खाणाराना कळेल तेव्हा , हातात पाना तेव्हाच पोटात दाणा हे कामगारांना उमजेल एसीत नाही उमजायचे . शहाणपण शिकवताना परीणामाची चिरूट काढण्याची अक्कल असते का ? त्यामुळे लोक कोरोनापासून वाचवताना उपाशी मरु नयेत याची काळजी घेतली पाहिजे .