Halloween party ideas 2015



नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचा
महाराष्ट्रात प्रथमच लोखंडी इलेक्ट्रिक पोलमधे विजेचा प्रवाह (करंट) उतरून दुर्घटना घडू नये याकरीता PVC पाईप टाकण्याचा अनोखा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्रात प्रथमच अमळनेर नगरपरिषदेच्या *प्रभाग क्रं 14 मधे हा नवीन उपक्रम राबवीत असून मुख्य चौक, वर्दळीच्या ठिकाणी किंवा नागरिकांच्या घराजवळ असणाऱ्या लोखंडी इलेक्ट्रिक पोल मधे पावसाळ्यात विजेचा प्रवाह (करंट) येऊन लहान मूल किंवा नागरिक अथवा मुक्या प्राण्यासोबत काही दुर्घटना घडू नये याकरिता *नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील व रवि पाटील* यांनी सुरक्षेच्या (सेफ़्टीच्या) दुष्टीने स्व:खर्चाने PVC पाईप आणून त्यांचे 5 ते 6 फुटांचे तुकडे करून नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांन मार्फत इलेक्ट्रिक पोल मधे PVC पाईप टाकण्यात येत असून जेणे करून नागरिकांसह लहान मूल, मुके प्राणी सुरक्षीत राहतील. इलेक्ट्रिक पोल मधे PVC पाईप टाकण्याचा शुभारंभ करतांना *नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील* सोबत रवि पाटील, गोकुळ पाटील, पी.डी.पाटील, सुभाष नाना, संजय सोनवणे, अश्विन पाटील, विजय वाणी, राहुल शिंपी, भरत पाटील, शिवनारायण पाटील, अमोल पाटील, रोहित तेले, किरण अहिरे, तुषार बाविस्कर, योगेश भदाणे, आकाश पाटील, कल्पेश पाटील, प्रकाश पाटील, मूकरदम गोपाल गजरे व इ.नगरपरिषद कर्मचारी यांनी सहकार्य केले.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.