अमळनेर शहरात लाँकडाऊनाचे उल्लंघन करणाऱ्या 97 नागरिकांवर कारवाई,
35 हजार रूपायाचा दंड केला वसुल.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगांव जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या लाँकडाऊनला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी अमळनेर शहरातील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांचे सहकारी बांधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही नागरिक लाँकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे त्यांचे निर्दशनास आल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.
आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.
प्
आज लॉक डाऊन च्या अनुषंगाने शहरात फिरणारे लोकांवर 97 केसेस व 35 हजार दंड आकारण्यात आले यात विनापरवाना बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आली.
सदरचे पथकाने मा. Add SP Shri Sachin gore sir यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सपोनी प्रकाश सदगिर, सपोनि एकनाथ ढोबळे, पोउपनि गणेश सूर्यवंशी व राहुल लबडे तसेच कर्मचारी पोना डॉ.शरद पाटील, पोह संजय पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, अमळनेर बस डेपो चे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली
अमळनेर शहरातील नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे,कायद्याचे उल्लंघन करू नये नाहीतर कडक कारवाई केली जाईल असे अमळनेर शहरातील कार्यक्षम पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितले.