मातृभूमीची जाण ठेवत विविध क्षेत्रात कार्यरत भूमीपुत्रांनी अमळनेरच्या अन्नछत्रसाठी दिले भरीव योगदान
खान्देशी कट्टा व डॉ भूषण पाटील आणि मित्र परिवाराने दाखविले दातृत्व
अमळनेर- 18 मे नंतर सुरू झालेल्या वाढीव लॉक डाऊन कालावधीत आपल्या मातृभूमीतील गोरगरिब बांधवाची भूख भागवावी यासाठी अमळनेरात शालेय शिक्षण घेऊन काही बाहेरगावी तर काही गावातच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खान्देशी कट्टा व डॉ भूषण पाटील व मित्र परिवाराच्या सदस्यांनी भरीव निधी संकलित करून गोक्षेत्र प्रतिष्ठानच्या अन्नछत्रसाठी मदतीचा हात दिला.
सदर ग्रुपने 51 हजारांची भरीव मदत दिल्याने यातून सुमारे सात हजारांच्या वर गोरगरिबांना एक दिवसांचे अन्नदान करण्यात आले.सदरचा धनादेश गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित भानुबेन शहा गोशाळेत प्रत्यक्ष जाऊन चेतन शाह व संदीप घोरपडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.धनादेश देताना खान्देश कट्टा ग्रुपचे सदस्य तथा अमळनेर न प चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,डॉ अतुल चौधरी,अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,युवा उद्योजक जयेश पाटील,ईश्वर सैनांनी,संतोष पाटील,ओमसाई संस्थेचे अध्यक्ष चेतन जाधव उपस्थित होते.गोशाळेतर्फे सदर योगदानाबद्दल संपूर्ण ग्रुपचे चेतन शाह,राजू सेठ,प्रा अशोक पवार,चेतन सोनार,महेंद्र पाटील,संदीप घोरपडे,रणजित शिंदे,गोपाळ धनगर आदींनी आभार व्यक्त केले.दरम्यान सदर खान्देश कट्टा ग्रुपमध्ये अमळनेर जी एस हायस्कुलमधील 1995 वर्षीचे 10 वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून याशिवाय इतर शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील यात सहभागी आहेत.हे विद्यार्थी आज मुंबई पुणे,नाशिक,जळगाव व बंगलोर येथे कुणी डॉक्टर,कुणी इंजिनिअर,उद्योजक,व्यापार,याशिवाय विविध क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचले आहेत.अमळनेरचे स्त्रीरोग तज्ञ डॉ भूषण पाटील यांच्या माध्यमातून हा मित्र परिवार दूर राहूनही एकसंघ असून यात जळगावचे एम डी डॉ परीक्षित बाविस्कर,नाशिक चे अर्थोपेडिक्स सर्जन डॉ संदीप सोनवणे,बिल्डर राहुल शिसोदे,हस्ती बँक व्हा चेअरमन वृषभ पारख यासह प्रा किरण पाटील,गुणवंत पाटील,निलेश देवपुरकर,हितेश शाह आदीअनेक नामांकिताचा समावेश आहे.नाशिक येथे कार्यरत शिरीष शिंपी व अमळनेरचे सुरज सराफ यांनी सोशल मिडियाद्वारे सर्वाना अनेक वर्षांनी संपर्कात आणून खान्देशी कट्टा या ग्रुपची निर्मिती केली असून यामाध्यमातून दूर असले तरी सतत संपर्कात राहून एकमेकांच्या सुखदुःखात हा मित्र परिवार येत असतो.कोरोना महामारीत बेरोजगार झालेल्या गोरगरीब बांधवांसाठी ग्रुपतर्फे योगदान द्यावे अशी विनंती डॉ भूषण पाटील यांनी केल्यानंतर सर्वांनी सढळ हाताने मदत दिल्याने गोरगरिबांना एक दिवसांचे अन्नदान झाले असून याव्यतिरिक्त अजून निधी शिल्लक असल्यांने त्यातूनही काही गोरगरीब बांधवाना भरीव मदत दिली जाणार आहे.
