आता संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. लाँकडाऊनमुळे संपूर्ण जग जागतिक मंदीकडे वाटचाल करत आहे. यामुळे बेरोजगारीत वाढ झाली.हे संकट फक्त चीनपर्यत राहील व याचा प्रभाव चीनवरच पडेल असा अंदाज ओइसीडी(organisation for Economics co-operation and devlopment) म्हणजेच आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा फोल ठरला.
ओइसीडी ही जगातील 32 देशांचा सहभाग असणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. व याची स्थापना १९४८ साली पँरिस येथे झाली.आर्थिक प्रगती आणि संपूर्ण जगातील व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी या संघटनेची निर्मिती करण्यात आली.
आर्थिक संकट म्हणजे काय ,कोणाच्या मते मंदी तर कोणाच्या मते महामंदी. परंतु लाँकडाऊन नंतर या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या सगळ्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रावर सुद्धा वाईट परिणाम झाला. कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याआगोदर मोठ्या प्रमाणात अनुत्पादित कर्ज व नवीन कर्जासाठीची घटलेली मागणी यामुळे हे क्षेत्र खिळखिळे झाले आहे.
दोन महिन्यांच्या लाँकडाऊनमुळे कष्टकरी लोकांवर व संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.स्थावर क्षेत्रात विस्कळीत झालेल्या आर्थिक व्यवहारांचे परिणाम वित्तीय क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रांवर झाला.उत्पादन व्यवस्था, उद्योग, शेतीची स्थिती, बँकाची स्थिती,इन्फ्रास्ट्रक्चरची आबाळ,गुंतवणुकीची टंचाई, बेकारी, आरोग्य आणि शिक्षणाची हेळसांड हे जुनेच प्रश्न भारताला आजही भेडसावत आहे.भारतात विरोधाभास आहे.एकीकडे गोदामात धान्य शिल्लक असते. तर दुसरीकडे कितीतरी लोक उपाशी झोपतात. लाँकडाऊन नंतर लोकांचे जीवन सुरळीत होण्यासाठी खूप मोठ्या काळाची गरज लागेल. लघुउद्योग, शेतकरी, मजूर वर्ग आणि लघुव्यावसायिक यांच्यासाठी येणारा काळ आव्हानांचा राहील.
सिएरा लिओनीमध्ये इबोलाचा (२०१४-१५)मध्ये प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी उपासमार व कुपोषणात मोठी वाढ झाली होती. तशी परिस्थिती आता सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन उर्जा निर्माण झाली. यासाठी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पँकेज जाहीर केले. याचा विचार केला असता पाच पद्धतीत विभागणी होणे आवश्यक आहे
१) अर्थव्यवस्था २) इन्फ्रास्ट्रक्चर ३) तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था ४) लोकसंख्या ५)मागणी.
भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला कितपत मिळणार हे आता सांगणे कठीण आहे परंतु शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहचणे आवश्यक आहे.आता सध्या लहान आणि मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहे. आणि त्यात परप्रांतीय मजूर होते ते काम नसल्याने आपल्या गावी परतले. त्यामुळे पुन्हा सगळे सुरळीत झाले की पुन्हा मजूर ,कारखाना चालू झाल्यानंतर दयावे लागणारे भाडे, इतर खर्च याचे नियोजन करणे आवश्यक आहे
लहान मोठ्या लघुउद्योगांना याचा कितपत फायदा होईल हे जेव्हा सगळे सुरळीत होईल तेव्हा काही महिन्यांनी समजले.सर्व व्यवसायात ई-प्रणालीचा वापर करणे फायदेशीर ठरेल. या योजनेतून नवीन उद्योग सुरु होतील व बेरोजगारांना काम मिळेल. व्यवसाय कोणताही असो तो सुरुवातीला 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चालवा लागतो. आता सुद्धा हेच करावे लागेल.
सुरुवातीला ई-मार्केट प्रणाली, फिजिकल डिस्टन्सिंग ,आँनलाईन मार्केटिंग यावर भर दयावा लागेल. तुमची वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे,हे सांगावे लागेल. आता तर तरुण उदयोजकांना नवीन संधी चालू आल्या आहेत. त्याचा फायदा ते नक्कीच घेतली. आता बँक पण सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध करून देईल. त्याचा फायदा निश्चित लोकांना होईल.
लाँकडाऊन नंतर महामंदी येईल पण त्यावर योग्य उपाययोजना केल्यास नक्कीच यातून मार्ग निघेल. आणि याचा फायदा स्थानिक लोकांना होईल. त्यांना त्यांच्या राज्यात रोजगार उपलब्ध होईल.आणि त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर बनेल.
लेखिका
अमिता कदम
प्राध्यापिका
पुणे .
9819395788.
