विज कर्मचाऱ्यांनच्या हलगर्जीपणामुळे वत्साई एज्युकेशन सोसायटीचे लाखो रूपायाचे नुकसान
अनेक वेळा तक्रार करूनही विज मंडळाचे अधिकारी झोपेत.शाळेतील ३ लाख २० हजारांच्या सर्व वस्तू जळून खाक
वत्साई संस्थेचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भदाणे यांची मुख्यमंत्री, उर्जामंत्रीसहीत अनेक अधिकारी यांच्याकडे तक्रार.
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वत्साई एज्युकेशन सोसायटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बऱ्याच वेळा अगोदरही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याची आज पर्यंत वीज मंडळाचे अधिकारी कर्मचारी दखल घेतली नाही.आता लाखो रूपायांचे नुकसान झाल्यामुळे मा.मुख्य अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी लि.जळगाव यांच्याकडे वत्साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत भदाणे यांनी तक्रार केली आहे.
सविस्तर माहिती अशी कि आपल्या कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागून लाखांचे पाचव्यांदा नुकसान झाले त्याबाबत तक्रार संदर्भ:-१ आमचे जा.क्र./२३/२०१८दि.२२/१०/२०१८चे कार्यकारी अभियंता,धरणगाव यांना दिलेले पत्र. २)आमचे जा.क्र./२८/२०१८दि.०६/०८/२०१८चे कार्यकारी अभियंता,धरणगाव यांना दिलेले पत्र.
३)आमचे जा.क्र./०७/२०१८दि.२/०५/२०१८चे सहाय्यक अभियंता,मंगरुळ यांना दिलेले पत्र. ४)आमचे जा.क्र./१०/२०१८दि.३०/०५/२०१८चे कार्यकारी अभियंता,धरणगाव यांना दिलेले पत्र.
५) आमचे जा.क्र./१७/२०१६दि.१८/०८/२०१६चे सहाय्यक अभियंता,मंगरुळ यांना दिलेले पत्र.
वरील संदर्भीय विषयास अनुसरुन आपणास विनम्र होऊन नम्र विनंती करतो की मी,चेअरमन वत्साई एज्युकेशन सोसायटी ता. अमळनेर आमच्या संस्थेने मु.पो. मंगरूळ ता. अमळनेर जि.जळगाव येथे गट नंबर २९७/४ मध्ये शैक्षणिक कामी N/A झालेल्या जमिनीवर पर्ल इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक संस्था (I.T.I.)हे शासन मान्य कोर्स सुरु आहेत .आपल्या कडून १५ के डबल्यु लाईन आम्ही घेतलेली आहे .दि.२५/०४/२०२० रोजी दु. १२ वाजता
आपल्या कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे पाचव्यांदा फेज डबल होवून आमच्या संस्थेचे लाखोचे नुकसान झाले आहे. संगणके.सी.सी.टी.व्ही.कॅमेरे,केबल वायर बंडल, फॅन, लाइटस म्हत्वाचे फाईल्स कॅम्प्युटरस इ.वस्तु जळून खाक झाले आहेत .आपल्याकडील वरील संदर्भ पत्रान्वये तक्रार करुन देखील आतापर्यंत आपल्या भ्रष्ठ कर्मचा-यांनी हेतूपूर्वक
दुर्लक्ष केल्याचे आजच्या प्रकरणातून स्पष्ट होते आमचे वरील प्रत-१)आमचे जा.क्र./२३/२०१८दि.२२/१०/२०१८चे कार्यकारी अभियंता,धरणगाव येथे दिलेले
पत्रान्वये ३,२००००/-(अक्षरी-तीन लक्ष वीस हजार )नुकसान झालेले आहे.याबाबत आपणाकडून दोन वेळा तपासणी घेऊन पोलीस पंचनाम्यासह वरील पत्र दिलेले आहे तरी आतापर्यंत एक रुपयासुदधा संस्थेला नुकसान भरपाई ही मिळालेली नाही आपल्या या आडमुठे धोरणामुळे संस्थेला यामुळे पाचव्यांदा लाखोच्या नुकसानीला
सामोरे जावे लागले आहे. दि २५/०४/२०२०रोजी पुपारी वाजतड
eləwe adu..bunswes loलावू, संस्थत शार्टसकिट होवून पून्हा संगणके,सी.सी.टी.व्ही.कॅमेरे ,केबल वायर बंडल, फॅन, लाइटस म्हत्वाचे फाईलस कॅम्प्युटरस इ.वस्तु जळून खाक झाले आहेत त्यामुळे लाखोचे नुकसान पाचव्यांदा झाले आहे. 'आपल्या अमळनेर सबस्टेशन बाजूला बेकायदेशीर रित्या पूर्वीच पोल काढून त्या ठिकाणी नवीन भ्रष्ठ मार्गाने
सदरील पोल हलविले व कमी उंचीचे ३३ के डबल्यु ची लाईन आमच्या लाईनीवरुन नेली गेली त्यामुळे आमचे नुकसान हे झालेले आहे मात्र अधिका-यांच्या संगनमतामुळे आज आम्हाला पूनश्च पाचव्यांदा या प्रचंड अश्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
याबाबत पुर्ण सखोल चौकशी होऊन आम्हाला अगोदरची व आजची झालेली नुकसान भरपाई पूर्ण त्वरीत मिळवुन द्यावी.भविष्यात पुन्हा आम्हाला अशा प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण दक्षता व खबरदारी घ्यावीअसे तक्रार अर्जात म्हटले आहे.
