Halloween party ideas 2015


* अँँड .अपर्णा व अरुण रामतीर्थकर दाम्पत्यास भावपूर्ण श्रद्धांजली*

सामाजिक कार्यकर्त्या अँँड . अपर्णा ताई रामतिर्थकर यांचे आज दूःखद ‌ निधन झाले .त्यांनी आपले विचार सर्वदूर जावेत म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला. महिलांमध्ये त्यांचा एक चाहता वर्ग होता . त्यांच्या अमोघ वाणीमुळे त्या सर्वदूर परिचित होत्या . एका अर्थाने त्या धुळ्याच्या सून होत्या . त्यांचे सासरे हे महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर होते . खोल गल्लीत जुन्या महाराष्ट्र बँकेच्या वरच्या मजल्यावर ते रहात . ती जागा बहुदा गरूड किंवा देशपांडे यांच्या मालकीची असावी . त्यांचे पती अरूण रामतिर्थकर हे माझे विद्यावर्धिनी कॉलेजचे वर्ग मित्र त्यावेळी ब मु मोरे , मी स्वतः गो पि. लांडगे , श्रीकांत नांदेडकर , भगवान जाधव . विजय उत्तमराव पाटील . धरमसी असे मिळून रॉयल सर्कल ही संघटना स्थापन करून दोन तीन वर्ष कॉलेज निवडणूकाही लढविली . वास्तविक अरूण , विजय , श्रीकांत हे कट्टर संघाचे व मी राष्ट्रसेवादलाचा आमचे प्रसंगी खटके उडत मात्र कॉलेज निवडणूक सोबत लढत असू . तत्कालीन जनसंघाचे नेते माजी मंत्री स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्याशी या परिवाराचे घनिष्ठ संबंध . नानासाहेबांचा मुलगा विजय आणि अरूण हेही घनिष्ठ मित्र होते . अरूण रामतिर्थकर हे फर्डे वक्ते होते . धुळयात शिवसेना स्थापन करण्यात त्यांचाही वाटा होता . स्व . बापू दादा शार्दूल आणि सुधाकर आप्पा मोगलाईकर या धुळे जि. शिवसेनेच्या संस्थापकांसोबत त्यांनी त्याकाळी खूप काम केले . पुढे ते केसरी आणि तरुण भारत सोलापूर येथे संपादकीय विभागात काम करीत होते . गेल्याच वर्षी पक्षघाताने आजारी पडले . त्यातच त्यांचे निधन झाले .आमचे अरूणशी दूरध्वनीवरून अधून मधून बोलणेही होत असे . आमचे सर्वांचेच गुरूवर्य , प्रा .डॉ .बी आर जोशी सर , व श्रीकांत नांदेडकर यांच्याशी आताच बोलत असतांना जुन्या स्मृतीना उजाळा मिळाला . मित्रवर्य अरूण रामतीर्थकर यांच्याशी वैचारिक मतभेद होते पण आमचे मनभेद नoहते . शेवटपर्यंत आपल्या लेखनिशी इमानदार असलेले पत्रकार मित्र अरूण व त्यांच्या पत्नी , कायम आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहीलेल्या अपर्णा ताई या दाम्पत्यास भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐-
गो .पि . लांडगे
( ज्येष्ठ पत्रकार धुळे )

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.