वाघोली -
वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार यांची 703वी पुण्यतिथी विविध साहित्य उपक्रमाने साजरी करण्यात आली, यात वाचन संस्कृती पुरस्कारसाठी साहित्यज्ञान, लेखन, कविता, साहित्यिक, साहित्यकृती असे स्वरूपाचे लेखन ऑनलाइन मागविण्यात आले होते, 1990 पासून अशा विविध साहित्यिक उपक्रमात समाजाला सहभागी करून, संत साहित्य वाचन, चिंतन उपक्रमातून पुण्यतिथी साजरी केली जाते, यावर्षी साहित्यलेखन लक्षात घेऊन यावर्षीचा वाचन संस्कृती पुरस्कार हा कैलास पवार वाघोली पुणे यांना घोषित करण्यात आले आहे असे "संयोजक प्रा .डॉ, बाबुराव उपाध्ये, व कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी घोषित केले, राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी हा संपल्यानंतर सदर पुरस्कार हा कैलास पवार यांना बहाल करण्यात येणार आहे अशी सुत्रांकडुन माहिती प्राप्त झाली असुन पवार यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील काम हे कौतुकास्पद आहे.यावेळी सदर घोषित पुरस्कार संबधी माहिती ही इतरांना प्राप्त होताच मित्रपरिवार व नातेवाईक तसेच अनेकांनी पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
