माळी महासंघाचे कट्टर कार्यकर्ते
धुळे प्रतिनिधी
- धुळे येथील माळी महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते विलासराव पाटील दिनांक 3 मे रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण करीत आहेत सरांनी महाविद्यालयात असतानाच सामाजिक कार्याला सुरुवात केली होती 1985 ला ते महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे आजीव सभासद झाले त्या नंतर ते देवळी ता,अमळनेर या त्यांच्या मूळ गावी ग्रामशाखा प्रमुख झाले त्याच्या कामाचा उरक पाहून महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. प्रा.चंद्रकांत पांढरे सरांनी अमळनेर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली तसेच त्यांची निवड मध्यवर्ती नेतृत्व शिबीर साठी केली यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 100 कार्यकर्त्याची निवड केली होती.1989साली हे शिबीर महाबळेश्वर येथे 3दिवस झाले होते.तेव्हा पासून आतापर्यंत विलासराव "माळी" हाच आपला पक्ष मानून मागील पस्तीस वर्षांपासून काम करीत आहेत त्यांनी नोकरी निमित्ताने धुळे येथे वास्तव्य केले 1992 साली माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्याचा उपक्रम सुरू केले हा उपक्रम2006 पर्यंत सुरू होता 1995 ला ते धुळे जिल्हा सरचिटणीस झाले तर 1998 ला धुळे जिल्हा अध्यक्ष झाले त्यानंतर 2001 ला अखिल भारतीय माळी महासंघाची स्थापना झाली विलासराव याना विशवस्थ म्हणून घेतले त्यानंतर त्यांचेकडे माळी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले आता त्यांचेकडे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे .ही सर्व जबाबदारी पार पाडत असताना मला समाजबांधव व सहकाऱ्यांनी खूप मदत केली त्यांच्या बद्दल ते नेहमीच ऋण व्यक्त करतात.कै प्रा .चंद्रकांत पांढरे सरांनी विलासरावना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी नेले त्यामुळे त्यांना अनेक नामवंत लोकांना भेटता आले .महासंघातर्फे त्यानी अनेक उपक्रम राबविले त्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर वधू वर परिचय मेळावे गुणवंत विद्यार्थी सत्कार जागृती मेळावे यांचा समावेश आहे.11एप्रिल1999 रोजी धुळे येथे सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांना "भारत रत्न"पुरस्कार मिळावा अशीं मागणी केली यासाठी विविध ठिकाणी मेळावे घेतले अनेक गावांत सभा घेतल्या सह्यांची मोहीम राबवली मा. पंतप्रधान व मुख्यमंत्री याना पत्र पाठवले व पाठपुरावा केला जातो आहे तसेच 28नोव्हेंबर महात्मा फुले यांच्या स्मृतिदिन "शिक्षक दिन" म्हणून शासनाने घोषित करावा यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा सुरू आहे .यासाठी2003 पासून यादिवशी नाशिक अहमदनगर जळगाव धुळे व नंदुरबार या पांच जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रम शील शिक्षकांना "गुरुगौरव" पुरस्कार स्वखर्चाने देत असतात हा उपक्रम फक्त माळी समाजासाठी नसतो तर सर्वांसाठी असतो. विलासराव सरांनी देवळी येथे महात्मा जोतिरा व फुले यांच्या नावाने हायस्कुल सुरु केले आहे येथे सर्व कर्मचारी हे माळीच आहेत.तसेच सवित्रीआई फुले यांचे नावाने वाचनालय सुरू केले आहे.विलासराव पाटील यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा अपक्ष निवडणूक लढ विली आहे . विलासरावांच्या माळी हाच पक्ष या विचाराने 35 वर्षपासून केलेल्या कार्यास सलाम. तसेच सरांनी आमदार होऊन माळी समाजासाठी योगदा न द्यावे ह्या शुभेच्छा.!
शुभेच्छुक
काशिनाथ माळी ब्राम्हणवेल।
अनिल सोनवणे जैताने
संजय खलाणे धुळे।
नितीन शेलार दाभाडी
जितेंद्र खैरनार पाटणा
राजेंद्र निकुंभ नाशिक
संतोष पुंड नाशिक
ईश्वर महाजन अमळनेर
व्ही आर महाजन भडगाव
वासूदेव माळी नंदुरबार
आंत्रे सर राहता
जगन्नाथ सूर्यवंशी राहुरी
उत्तम अनाप लोणी
