Halloween party ideas 2015


*एरंडोल येथे लॉकडाऊन मुळे लॉक डोअर विवाह*

धरणगांव - धरणगांव येथिल माळी समाजाचे सचिव दशरथ झेंडू माळी यांची कन्या चि. सौ. का. सुवर्णा ईचा विवाह एरंडोल येथील हॉटेल नीलम गार्डन चे मालक सुरेश मुकुंदा महाजन यांचा ऐकूलता एक मुलगा चि. आकाश यांच्याशी आज रोजी साध्या पद्धतीने लॉकडाऊन च्या नियमांचे काटेकोर पणे पालन करुन(लॉकडाऊन ते लॉक डोअर) विवाह घरगुती वातावरणात पार पाडण्यात आला .
या प्रसंगी वधू पिता दशरथ झेंडू महाजन यांनी सामाजिक बांधिलकी ठेवत व महात्मा फुलेंच्या विचारांना आदर्श मानत वधू आणि वरांच्या नावाने 2 लाख रुपये डीपॉजीटचा चेक (स्वामी विवेकानंद पतसंस्था धरणगांव) वधू वरांना देण्यात आला . तसेच देशात व राज्यात बऱ्याचश्या लोकांना कोरोना विषाणू ची लागण झाली आहे व काही लोक मृत्यु मुखी पडत आहेत या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वधू पिता दशरथ महाजन यांनी देशा व राज्यावरचे संकट हे माझ्या परिवारा वर संकट आहे ही भावना जागृत होऊन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधिस *११,००० /- रु. चेक विवाह प्रसंगी धरणगांव शासकीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख श्री गुलाबराव वाघ यांच्या कडे सुपूर्त केला .
या प्रसंगी एरंडोल चे मा. नगराध्यक्ष देवीदास महाजन तसेच धरणगांव माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन व वर वधूचे माता पिता व मामा ऐवडे लोक उपस्थीत होते .
वधू वरांच्या नावे 2 लाख रुपये डीपॉजीटचा चेक व मुख्यमंत्री सहाय्यता निधिस ११,०००/- रुपयाचा चेक दिल्या बद्दल वधू पित्याचे गुलाबराव वाघ , देवीदास महाजन , विठोबा महाजन यांनी आभार मानले व वधू वरांना शुभेच्छा दिल्या .

*समाजाने या विवाहापासून बोध घ्यावा*
आपल्या समाजाने , या उपक्रमापासुन आदर्श घ्यावा,असा अतिशय कौतुकास्पद कामगिरी आहे. मी मनापासून सर्वच सन्माननीय मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. तसेच विशेष कौतुक नव वधुवरांचेही करतो. की, ज्यांनी या छोटेखानी लग्नास मान्यता दिली. नाहीतर आजकालच्या पिढीला फक्त गाजावाजा हवा असतो. मित्रांनो , या अशा विचार आचारांची आपल्या समाजाला नित्तांत गरज आहे. मी मनापासून शतशः धन्यवाद मानतो सर्वच सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे. आदरणीय देविदास भाऊ महाजन, माननीय गुलाब भाऊ वाघ, भाऊसाहेब दशरथ झेंडु माळी, भाऊसाहेब सुरेश मुकुंदा महाजन, भाऊसाहेब विठोबा नामदेव महाजन . नव वधुवरांस भावी आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
मा. मुरलीधर राजाराम महाजन .
संस्थापक अध्यक्ष,
खान्देश माळी महासंघ, जळगाव.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.