प्रतिनिधी अमळनेर
चुकीचे वितरण केल्यास चौकशी होऊन परवाना होणार रद्द होणार असून वितरण निकोप ठेवा तक्रारी येऊ देऊ नका अशा सूचना आमदार अनिल पाटील स्वस्त धान्य दुकानदारांच्या आढावा बैठकीत दिल्या
सायंकाळी 4 वाजता सोशल डिस्टनसिंग पाळून 10 च्या संख्येने आढावा घेतला. तहसीलदार मिलिंद वाघ, एल टी पाटील डॉ रामराव पाटील, तालुका पुरवठा अधिकारी संतोष बावणे, पुरवठा अव्वल कारकून नाना पाटील, अशोक ठाकरे रोहित पोतदार आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सूचना केल्या त्यात पाच किलो मोफत धान्य वाटप वाटप मे महिन्यात होणार असून
नियमित कार्ड धारकांना व 2 तांदूळ आणि 3 युनिट धारकाला प्रती माणसी 5 किलो धान्य वितरित करण्यात आला आहे यात नियमित कार्डधारकांना अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वितरण करण्याच्या सूचना दिल्या.
केशरी कार्ड धारकांना वाटप मे महिन्यात त्यांना तांदूळ 8 रुपये दराने व गहू 12 रु किलो गहू कार्डधारकांना वितरण होणार दुकानदाराने हयगय अथवा गडबड केली त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. याचबरोबर आतापर्यंत किती वितरण झाले याचा आढावा घेतला. तहसीलदार यांनीही यावेळी सूचना दिल्या असून या वितरणावर शासन लक्ष ठेवेल त्यामुळे दुकानदारांनी गडबड करू नये.
