शेतकरी व व्यापारी बांधवाना होतोय लाभ
अमळनेर-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर येथील ओमसाई सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने सार्वजनिक हॅन्ड वॉश स्टेशन चा शुभारंभ बाजार समितीचे सभापती प्रफुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.सदर युनिटचा वापर गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी बांधव करीत आहे.
यावेळी संचालक प्रकाश भिमसिंग पाटील,ओमसाई संस्थेचे अध्यक्ष चेतन जाधव यासह बाजार समितीचे व्यापारी,कर्मचारी व हमाल बांधव उपस्थित होते.बाजार समितीत दररोज तालुक्यासह बाहेर गावाहून हजारो शेतकरी बांधव माल विकण्यासाठी येत असतात त्यांना मार्केटमध्ये आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हात धुण्यासाठी सोय व्हावी तसेच मार्केट मधील व्यापारी,कर्मचारी यांचीही सोय व्हावी यासाठी हे हॅन्ड वॉश युनिट बसविण्यात आले.या उपक्रर्माबद्दल सभापती प्रफुल पाटील यांनी ओमसाई संस्थेचे आभार व्यक्त केले.सद्यस्थितीत बाजार समिती बंदचे आदेश असले तरी पुढील आदेशानंतर सुरू झाल्यानंतर या युनिटचा उपयोग होऊ शकणार आहे.
