Halloween party ideas 2015




शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवशी जपली सामाजिक बांधिलकी
ईश्वर धोबी , प्रा शिक्षक यांचे स्तुत्य कार्य
भिलाली ता पारोळा
भिलाली ता पारोळा केंद्रातील अवघड क्षेत्रातील आदिवासी बांधवांची वस्ती असलेल्या जि.प. प्राथ शाळा हिवरखेडे बु!!. शाळेचे उपशिक्षक ईश्वर धोबी यांनी आपला वाढदिवस असल्याने फालतू खर्च न करता लॉक डाऊन मुळे गरीब व गरजू कुटुंबांना गृह उपयोगी व किराणा साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
हिवरखेडे बु!!.येथील जि प शाळेचे उपशिक्षक ईश्वर धोबी यांचा आज वाढदिवस असल्याने तो लॉक डाऊनमुळे व काहीतरी सत्कारणी साजरा व्हावा म्हणुन हिवरखेडे गावातील सर्व गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू (तेल,साखर,चटणी,मीठ,साबण,बिस्किट)यांचे वाटप करून शासन नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दगडू पाटील,शिवाजी जोगी,वसीम पठाण,भिलाली सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
गाम्रस्थांना गरजेच्या काळात जीवनावश्यक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसुन येत होते .
त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.