लाँकडाऊन काळात ररत्यावरील दिव्यांग बांधवाला सहकार्य करणाऱ्या कळमसरे येथील युवा कार्यकर्त्याचा माणुसकीला सलाम!!
अमळनेर प्रतिनिधी-
कोरोना गंभीर संकट..... अनेक मजुरांची हालअपेष्ठा , रोजंदारी काम करणारे मजुर यांच्या डोळ्यातील अश्रु मनाला वेदना देतात. काल रात्री दहा वाजेचा चा प्रसंग.... लाँकडाऊनमुळे वाहन व्यवस्था बंद असल्यामुळे अंधारात एक दिव्यांग माणुस त्याच्या तिन चाकी सायकलनेच पायडल मारत जळगांवहुन सुरत येथे आपल्या घरी निघाला होता.... पोलीसांनी त्यास जिल्हा हद्दी वरून माघारी पाठवले होते.......एवढ्या रात्री हतबल होऊन, रस्त्याच्या कडेला तीन चाकी सायकल वरच झोपी गेला होता.... तेथून जवळ शेती असलेल्या कळमसरे येथील सामाजिक बांधीलकी जोपासणारे युवा कार्यकर्ते अतुल नेमाडे यांना घरी परतत असताना ही व्यक्ती दिसली..... त्यांनी त्यास विचारले कोण? कुठले? तो घाबरला...., पण अतुल नेमाडेंनी सांगितले, घाबरू नका,मी शिवसैनिक आहे, थोडा निःश्वास टाकत तो म्हटला, " मी जळगाव येथे पॅकिंग कंपनीत काम करतो,कुटुंब सुरत ला असते,21 दिवसापासून अडकून आहे... रेल्वे सुरु होणार नाहीत,.. म्हणून सायकलीनेच सुरत येथे निघालो होतो..., सकाळचा अन्न नाही पोटात ...."मग अतुलजीने त्यांच्या Farm HOuse नेवुन त्या दिव्यांगाला जेवु खाऊ घातले... झोपवायची व्यवस्था केली.व दुसऱ्या दिवशी सकाळी हाती काही पैसे व शिधा देऊन जळगाव येथे पोहोचते केले......"
प्रत्येक कामाच्यावेळी स्वार्थ हा विचार करायचा नसतो.माणुसकी महत्वाची असते.चांगल्या कामाचा समाज सन्मान करतो..कळमसरे येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील डॉ सुधाकर नेमाडे यांचे ते चिरंजीव आहेत.यांच्या सामाजिक बांधीलकीचा पगडा अतूलवर असल्याने अतुलच्या सामाजिक बांधीलकीला सलाम....
